Amit Deshmukh sakal
मराठवाडा

Amit Deshmukh : सिंहासनाच्या रस्सीखेचीत आम्हाला कशाला ओढता ; आमदार अमित देशमुख

राज्यात सुरू असलेल्या सिंहासनाच्या रस्सीखेचीत आम्हाला कशाला ओढता, आम्ही आहोत त्या ठिकाणी ठीक आहोत, असे सांगून काँग्रेसचे माजीमंत्री, आमदार अमित देशमुख यांनी त्यांच्या भारतीय जनता पक्षामधील प्रवेशाच्या चर्चेला एक प्रकारे पूर्णविराम दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : राज्यात सुरू असलेल्या सिंहासनाच्या रस्सीखेचीत आम्हाला कशाला ओढता, आम्ही आहोत त्या ठिकाणी ठीक आहोत, असे सांगून काँग्रेसचे माजीमंत्री, आमदार अमित देशमुख यांनी त्यांच्या भारतीय जनता पक्षामधील प्रवेशाच्या चर्चेला एक प्रकारे पूर्णविराम दिला आहे.

दुसऱ्या लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता.१५) डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधाकर शृंगारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय महानाट्यात आमदार अमित देशमुख व आमदा धीरज देशमुख भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

हाच धागा आमदार काळे यांनी आपल्या भाषण घेतला. आमदार अमित देशमुख यांना घेऊन जायला आलो आहोत, अशी सुरुवातच त्यांनी केली. एका बाजूला मी बसलो आहे, तर दुसऱ्या बाजूला खासदार बसले आहेत. राज्यात सुरू असलेल्या महानाट्यात गेल्या काही दिवसांपासून आमचे डोळे मुंबईकडे लागले आहेत. आमदार देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आम्ही हार घेऊन उभे आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर योग्य लाभ मिळतो. तुम्ही आमच्यासोबत आला तर अधिक आनंद होईल असे आमदार काळे म्हणाले.

त्यानंतर खासदार शृंगारे यांचे भाषण झाले. देशाला पुढे नेण्यासाठी तुमच्यासारख्या चांगल्या नेत्यांची गरज आहे. त्यामुळे तुम्ही चांगला निर्णय घ्याल, आम्ही तुमचे स्वागत करू. तुमच्यासोबत आम्हालाही पुढे जाता येईल. तुम्ही तसा निर्णय घेतला तर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांना देखील चांगले वाटेल असे खासदार शृंगारे म्हणाले. त्यानंतर आमदार देशमुख यांचे भाषण झाले. डॉ. जब्बार पटेल यांच्या काळातील ‘सिंहासन’ वेगळे होते.

आजच्या काळातील सिंहासन वेगळे आहे. आजचे सिंहासन हे साखळीने बांधलेले आहे. या सिंहासनाच्या रस्सीखेचीत आम्हाला कशाला ओढता, आम्ही जेथे आहोत तेथे ठीक आहोत असे देशमुख म्हणाले. त्यात आमदार काळे यांनी लगेच तुम्ही फक्त ठीक आहात, समाधानी नाहीत अशी कोटी बसूनच केली. यावर देशमुख यांनी सध्या सुखी, समाधानी, समृद्धी सर्वकाही तुम्हीच आहात, तुम्हाला सदिच्छा असे म्हणत सुरू असलेल्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला एक प्रकारे पूर्णविराम दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT