jalna crime sakal
मराठवाडा

Jalna Crime : वाढदिवसाच्या पार्टीत एकाचा खून ; जालना शहरात जुन्या वादातून घटना

छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावरील हॉटेल आदर्श पॅलेस इथे वाढदिवस पार्टीमध्ये जुन्या वादातून एकाचा चाकूने भोसकून खून झाला

सकाळ वृत्तसेवा

जालना : छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावरील हॉटेल आदर्श पॅलेस इथे वाढदिवस पार्टीमध्ये जुन्या वादातून एकाचा चाकूने भोसकून खून झाला. ही घटना शनिवारी (ता. तीन) मध्यरात्री घडली. नवनाथ गोपीचंद कुलभैय्ये (रा. बदापूर, ता. अंबड) असे या मृताचे नाव आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.

आदर्श पॅलेस येथे विठ्ठल विष्णू सोळुंके याच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पार्टी होती. एकाच ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये चालक असलेले कुलभैय्ये आणि अरुण श्रीसुंदर यांचा पार्टीत सहभाग होता. पंधरा दिवसांपूर्वी कुलभैय्ये याला ट्रॅव्हल्स कंपनी मालकाने नोकरीवरून काढले होते.

श्रीसुंदर यानेच आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा संशय कुलभैय्ये याला होता. या कारणावरून पार्टीत दोघांमध्ये वाद झाला. यातून कुलभैय्ये याला चाकूने भोसकले. त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती चंदनझिरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी दिली. या प्रकरणी संशयित श्रीसुंदर (रा. सायगाव डोंगरगाव, ता.बादपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन लॅब, फक्त ४९ अधिकारी, अन्नसुरक्षेचं FDAसमोर आव्हान; भेसळखोरांवर कारवाया वाढल्यानं यंत्रणेवर ताण

Sagreshwar Wildlife Sanctuary : 'सह्याद्री'च्या कुशीत खुललं पर्यटन! कडेगावातील सागरेश्वर, चौरंगीनाथ पर्यटकांना खुणवतोय; पावसाळ्यात घ्या मिनी महाबळेश्वरचा अनुभव

'स्प्लेंडर फिरवतो माझा जानू...' ट्रेडिंग गाण्यावर कमळी मालिकेतील कलाकरांचा भन्नाट डान्स, Viral Video

Nanded Hingoli Toll Plaza: वसुली जोरदार! ८० किमी अंतरात २ टोल नाके, नांदेड-हिंगोली महामार्गावर नियमाला हरताळ

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर शिक्षक बँकेच्या सभेत प्रचंड गोंधळ; शिक्षिकाही एकमेकींच्या अंगावर धावल्या

SCROLL FOR NEXT