संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

Vidhan Sabha 2019 : मतविभाजनाचा फटका कुणाला? (वार्तापत्र : औरंगाबाद पूर्व)

प्रकाश बनकर

औरंगाबाद - औरंगाबाद पूर्व मतदारसंघ एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता; मात्र वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून जातीय समीकरणामुळे या मतदारसंघातील राजकीय गणितेच बदलली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हक्‍काचा मुस्लिम मतदार एमआयएमकडे वळला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळाले; पण आता विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात मुस्लिम मतांचे विभाजन होऊ शकते. येथे एकूण 34 उमेदवार रिंगणात आहेत. असे असले तरी खरी फाईट ही भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे गफ्फार कादरी आणि समाजवादी पक्षाचे कलीम कुरेशी या तिघांत आहे. 

या मतदारसंघामध्ये वर्ष 2014 आणि त्यापूर्वीच्या निवडणुकीचे चित्र वेगळे होते. यावेळचे चित्र वेगळेच आहे. हे हेरूनच एमआयएम आणि भाजपने रणनीती आखली आहे. युतीचे उमेदवार अतुल सावे विकासाच्या जोरावर, तर एमआयएमचे उमेदवार वंचित घटक व अल्पसंख्याकांच्या विकासाच्या जोरावर निवडणुकीत उतरले आहेत. या मतदारसंघातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीला यंदा उमेदवारच मिळाला नाही. जो उमेदवार 2014 ला उभा होता त्याने राजीनामा दिला आहे. एमआयएममुळे कॉंग्रेसला सक्षम असा उमेदवारच मिळाला नाही. यामुळे सुरवातीला सपाचे कुरैशी यांना पाठिंबा दिल्यानंतर कॉंग्रेसने आता भूमिका बदलत अपक्ष उमेदवार युसूफ मुखाती यांना पाठिंबा दिला आहे. 

तब्बल 13 मुस्लिम उमेदवार 
गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम उतरल्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुस्लिम मतदार हा एमआयएमकडे गेला. तोच मतदार 2019 च्या लोकसभेतही एमआयएमच्या पाठीशी उभा राहिला; पण आता या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये तब्बल 13 मुस्लिम उमेदवार आहेत. यामुळे मुस्लिम मतदार पुन्हा एमआयएमकडे जाणार की, या 13 उमेदवारांमध्ये मतविभाजन होईल, हे येणाऱ्या 24 ऑक्‍टोबरलाच स्पष्ट होईल. मुस्लिम मतदारांतील मतविभाजनाचा सर्वांधिक फायदा हा महायुतीला होणार आहे. पूर्वमधून ज्याप्रमाणे मुस्लिम उमेदवारांची संख्या जास्त आहे, त्याचप्रमाणे बहुजन समाजाचेही 11 उमेदवार रिंगणात आहेत. 
 

अपक्षांचाही होणार परिणाम 
पूर्व मतदारसंघातून यंदा 65 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सहा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले; तर उर्वरित अर्जांपैकी 13 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. यामुळे 34 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात एकूण 23 अपक्ष उमेदवार उभे आहेत. हेच अपक्ष उमेदवारही प्रमुख उमेदवारांची मते खाणार आहेत. त्याचा निकालावर परिणाम होऊ शकतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT