bidi kamgar.jpg 
मराठवाडा

....अन् कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : आयटक प्रणित वीडी कामगार संघटनेने केलेल्या पाठपुराव्यानंतर सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत मजूर व कोंबडा वीडी उद्योगांनी आपापल्या कामगारांचे वेतन वाटप सुरु केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने अनेक क्षेत्रातील कामगारांचे बेहाल झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या असंघटीत कामगारांना केलेल्या कामाचेही वेतन मिळत नव्हते. यात कामगारांना वेतन मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. 

जिल्ह्यात तीन-चार हजार कामगार
नांदेड जिल्ह्यात वीडी उद्योगात अंदाजे तीन-चार हजार कामगार काम करतात. एकट्या नांदेड शहरात मजूर, कोंबडा आदी उद्योगात हजारो कामगार कार्यरत आहेत. एक हजार वीडी वळल्यानंतर त्यांना १७० रुपये एवढी अत्यल्प मजुरी मिळते. अचानक लॉकडाऊन सुरु झाल्याने या कामगारांनी केलेल्या कामाचे वेतन मालकांकडे थकीत होते. या क्षेत्रातील ८० टक्के कामगारांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन हा वीडी उद्योगच असल्याने त्यावरच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

लॉकडाउनमुळे रोजगार बुडाला
ता. १९ मार्च नंतर जमावबंदी, लॉकडाऊन घोषीत झाल्याने या कामगारांचा रोजगार बुडाला. त्यासोबत केलेल्या कामाचेही वेतन मिळेनासे झाले. त्यामुळे कामगारांवर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळली होती. जिल्हा प्रशासनाच्यावतीने बऱ्याच कामगार वस्त्यांमध्ये गुरुद्वारा अथवा सामाजिक, राजकीय, स्वयंसेवी संस्था मार्फत जेवन, अन्नधान्य पुरवठा होत आहे. मात्र औषध गोळ्या, दवाखाना सारख्या इतर जीवनावश्यक वस्तु नगदी स्वरुपात खरेदी कराव्या लागत असल्यामुळे कामगार आर्थिक अडचणीत आले होते. या कामगारांनी केलेल्या कामाची मजुरी व अतिरिक्त आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी जिल्हा प्रशासन, मालक व कामगार विभागाकडे आयटक प्रणित इंडस्ट्रीयल वर्कर्स युनियनच्यावतीने सातत्याने करण्यात आली होती. 

कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला
कामगार विभागाने सोशल डिस्टीन्सींगचा नियम पाळत कामगारांचे वेतन मालकांनी अदा करावे, अशा सुचना सहाय्यक कामगार आयुक्त सय्यद मोहसीन यांनी मालकांना दिल्या होत्या. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून मजूर, कोंबडा वीडी उद्योगाने तीन-चार कामगारांना बोलवून किंवा त्यांच्या वस्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांना सकाळी सात ते अकरा या वेळेत पाठवून कामगारांना वेतन वाटप सुरु केले आहे. त्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. दोन्ही व्यवस्थापनाने एकही कामगार थकीत वेतनापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कामगार नेते कॉ. प्रदीप नागापूरकर यांना दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT