hingoli photo 
मराठवाडा

बटाट्याच्या दोन एकर शेतात सोडली जनावरे...कुठे वाचा

जगन्नाथ पुरी

सेनगाव (जि. हिंगोली): लॉकडाउन परिस्थितीमुळे भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. सापटगाव येथील एका शेतकऱ्याचे बटाट्याचे पीक वाढले. मात्र, बटाटेच लागली नसल्याने या शेतकऱ्याने दोन एकर बटाट्याच्या उभ्या पिकात गुरुवारी (ता. सात) जनावरे सोडून दिली.

तालुक्यातील सापटगाव येथील शेतकरी पिनू पाटील यांनी दीड महिन्यापूर्वी दोन एकर शेतीत बटाटे लागवडीचा निर्णय घेतला. परिसरातील शेतकऱ्यांकडून बटाटे पिकाचे बेणे विकत आणून लागवड केली. रासायनिक खत, औषधी फवारणी केली. मोठ्या अपेक्षेने पिकाची देखभाल केली.

एकरी लाख रुपये उत्पन्न 

या भागातील विविध गावांतील शेतकरी मागील काही वर्षांपासून बटाट्याचे उत्पादन घेऊ लागले आहेत. या पिकाच्या माध्यमातून साधारणता एकरी लाख रुपये उत्पन्न मिळू लागले आहे. पिकाच्या लागवडीनंतर ९० दिवसांनंतर बटाटे उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. शेतकरी श्री. पाटील यांच्या बटाटे लागवडीला दीड महिन्याचा कालावधी लोटला असता पिकाची त्यांनी पाहणी केली. 

लागवडीसाठी ३० हजार रुपये खर्च 

यावेळी त्यांना धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. बटाट्याचे झाड चांगले वाढले. मात्र, जमिनीत बटाटेच लागली नाहीत. मोठ्या अपेक्षेने व जिद्दीने बटाटा लागवडीसाठी घेतलेल्या परिश्रमावर पाणी फेरले गेले. बटाटा लागवडीसाठी ३० हजार रुपये खर्च झालेला वायफळ गेल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

लागवड खर्चही निघाला नाही

शेतकऱ्यांकडून विकत आणलेल्या बटाटे बेण्याने दगा दिल्याच्या घडलेल्या प्रकारामुळे उत्पन्न तर सोडाच, परंतु लागवड खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी श्री. पाटील यांनी बटाट्याच्या उभ्या पिकात जनावरे चरायला सोडून दिली.

बटाटेच लागली नाहीत

दीड महिन्यापूर्वी दोन एकर शेतात परिसरातील शेतकऱ्यांकडून बटाटे बेणे आणून लागवड केली होती. मात्र, बटाटेच लागली नाहीत. या प्रकाराला कंटाळून शेवटी या उभ्या पिकात जनावरे चरण्यासाठी सोडून दिली आहेत.
-पिनू पाटील, शेतकरी, सापटगाव

मोबाइल विक्रेत्याने सुरू केली आंबा विक्री

सेनगाव : लॉकडाउनचा अनेक व्यवसायिकांना बसला आहे. येथील मोबाइल विक्रेते हेमंत संघई यांचाही व्यवसाय बंद असल्याने त्यांनी चक्क हापूस आंबा विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून त्यांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

लॉकडाउन केल्याने दुकानांना टाळे 

शहरातील हेमंत संघई या तरुण व्यवसायिकाचे बसस्थानक परिसरात मोबाइल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांचा व्यवसाय चांगला चालतो. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविल्या जातो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केल्याने अनावश्यक व चैनीच्या दुकानांना टाळे लागले. अनेक व्यवसायिक घरी बसून आहेत. 

हापूस आंबा विक्रीचा निर्णय

मात्र, छोट्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, या परीस्थिती खचून न जाता येथील मोबाइल विक्रेता हेमंत संघई यांनी रत्नागिरी येथील मित्राकडून रत्नागिरी हापूस आंबा मागवून विक्रीचा निर्णय घेतला. त्यांच्या छोट्या भावाचे जलशुद्धीकरण व थंड पाणी विक्रीचे दुकान आहे. 

६५० रुपये डझन दराने विक्री

तेथे आंबे ठेवून ६५० रुपये डझन दराने विक्री सूरू केली आहे. सध्या बाजारात गावरान आंबे दाखल झाले नाहीत. त्याचा फायदा हापूस आंबा विक्रेते घेत आहेत. श्री संघई यांनी चार दिवसांत १२ पेट्यांची विक्री केली आहे. मागणी वाढल्याने पुन्हा आंब्याचा माल मागविला आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT