मराठवाडा

औरंगाबाद : अण्णासाहेब पाटील आर्थिक मंडळाला पुरेसा निधी द्या;नरेंद्र पाटील

नरेंद्र पाटील; व्याज परताव्याची अडचण सरकारकडे मांडणार

राजेश नागरे

औरंगाबाद : मागील अडीच वर्षे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज ठप्प होते. दरमहा महामंडळाला ३० कोटी रुपयांची गरज आहे. गेल्या सरकारच्या काळात केवळ साडेबारा कोटींची तरतूद करण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी (ता.१५) पत्रकार परिषदेत केला. मंडळाला पुरेसा निधी द्यावा, व्याज परतव्यात येणाऱ्या अडचणी सरकारकडे मांडणार असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.

मराठा आरक्षण व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अडचणींबाबत नरेंद्र पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सुभेदारी विश्रामगृहात चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, महामंडळाच्या अडचणींची माहिती दिली. ‘बँका कर्ज प्रस्ताव नाकारत असल्यामुळे थेट महामंडळाने कर्ज द्यावे व २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. व्यवसायवाढीसाठी उद्योजकांना पुन्हा कर्जाची गरज आहे. या अडचणी लिखित स्वरूपात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे. सध्या जिल्ह्याला पालकमंत्री नाही आणि मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. त्यामुळे कदाचित महामंडळाचे अध्यक्षपद रिक्त असावे. मागील अडीच वर्षे महामंडळाचे कामकाज ठप्प होते. दरमहा महामंडळाला ३० कोटी रुपयांची गरज आहे. कर्ज मिळविण्याच्या जाचक अटी शिथिल करून योजना राबविण्यात येतील, असे पाटील म्हणाले.

बकाले यांची चौकशी करा

जळगाव जिल्ह्यातील पोलिस अधिकारी किरण बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, अशा घटनांत कडक कारवाई करावी. बकाले यांनी मराठाद्वेषातून जाणीवपूर्वक कुणाला त्रास दिला आहे का, याची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांच्यावरील आरोप फेटाळले

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीच्या अध्यक्षाची निवड लवकर करावी अशी मागणीही नरेंद्र पाटील यांनी केली. चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चा फोडल्याचा आरोप औरंगाबादच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला होता. याबाबत विचारले असता नरेंद्र पाटील यांनी आरोप फेटाळले. चंद्रकांत पाटील यांनी संघटनांना पाठबळ दिले. या पद्धतीचे राजकारण ते करणे शक्य नसल्याचे पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच उमेदवार ३ पक्षांकडून करत आहे अर्ज!

Latest Marathi News Live Update: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी वन आणि खाण विभागाची आढावा बैठक घेतली

Team India U19: आयसीसी U-19 वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT