file photo 
मराठवाडा

मुंबईहून परतलेला आणखी एक निघाला कोरोनाबाधित 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : सेनगाव येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदरील रुग्ण १८ वर्षीय युवक असून कहाकर बुद्रुक येथील रहिवासी आहे. तसेच तो मुंबईहून सेनगावात तालुक्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली.

जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या २३८ झाली असून यापैकी २०१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आता ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कळमनुरीतील एक रुग्ण उपचार घेत आहे.

७१० संशयित भरती

 आतापर्यंत जिल्ह्यात तीन हजार ९४४ कोरोना संशयित रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी तीन हजार ५८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ७१० संशयित भरती असून २२४ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती श्री. श्रीबास यांनी दिली.


काझी मोहेल्‍ला भाग कंटेनमेंट झोन घोषित

कळमनुरी : येथील एका महिला रुग्णाला नांदेड येथे उपचारादरम्यान कोरोना आजाराचे निदान झाल्यानंतर शुक्रवारी (ता.१८) शहरातील काझी मोहल्ला भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. संबंधित महिला रुग्णाच्या कुटुंबीयांतील १५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करून या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

नांदेड येथे खासगी रुग्णालयात दाखल 

आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शहरतील काझी मोहल्ला भागातील एका ५५ वर्षीय महिलेला उपचारासाठी नांदेड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. 

आरोग्य तपासणीचे काम हाती घेतले

रुग्णाचे स्वॅब नमुने अहवाल गुरुवारी (ता. १८) पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने शुक्रवारी शहरातील काझी मोहल्ला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. आरोग्य विभागानेही १०२ घरांमधील ६४२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच याच भागात ताप उपचार केंद्र सुरू करून आरोग्य तपासणीचे काम हाती घेतले आहे. 

१५ सदस्य विलीनीकरण केंद्रात 

या साठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद मेने, डॉ. महेश पंचलिंगे, डॉ. शिवाजी माने, डॉ. सोफिया खान, कर्मचारी अर्चना घुंगरे, कैलास ताटे, डी. पी. पंधरे, डी. जे. मस्के, जी. एस. मुकाडे यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तसेच कोरोना रुग्णाच्या कुटुंबातील १५ सदस्यांना संस्थात्मक विलीनीकरण केंद्रात हलविण्यात आले आहे. 

भाग केला सील

या सर्वांचे स्वॅब नमुन्याचा अहवाल शनिवारी प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, काझी मोहल्ला कंटेनमेंट झोन जाहीर झाल्यानंतर पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचारी मोहम्मद जाकीर, मनोज नकवाल, सुभाष काळे, मोहनीश वाढवे, गजानन इंगळे आदी कर्मचाऱ्यांनी हा भाग सील केला आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

Latest Marathi News Live Update : भरधाव कारची ४ ते ५ दुचाकींना धडक; तरुणीचा मृत्यू, नाशिकच्या उपनगर भागातील घटना

Pune News : ई-गव्हर्नन्स प्रभावी पद्धतीने राबविण्यात पुणे महापालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT