बीड : अतिवृष्टीचा जिल्ह्यात आणखी एक बळी  sakal
मराठवाडा

बीड : अतिवृष्टीचा जिल्ह्यात आणखी एक बळी

एकाच शेतकऱ्याने आठवड्यात घेतले दोनदा विष

सकाळ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे गंभीर परिणाम समोर येत आहेत. अतिवृष्टीच्या नुकसानीने हाती काहीच पडणार नसल्याने कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा या विवंचनेतून अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २४) समोर आली.

दिलीप शेषेराव शेजाळ (रा. कवडगाव, बु. ता. वडवणी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दिलीप शेजाळ यांनी शेतातील पिकांकडे नजर टाकली आणि शनिवारी (ता. २३) निराश होऊन शेतातच विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी बीड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्यासह पत्नी, दोन लहान मुले, एक मुलगी असा परिवार दुसऱ्यांच्या शेतात काम करून संसाराचा गाढा चालवीत होते. मात्र, यावर्षी निसर्गानेही आपली अवकृपा केली अन् होत्याचे नव्हते झाले. शेतात पेरलेले पीक या अतिवृष्टीने वाहून गेले. त्यातच कर्जाचा बोजा डोक्यावर आता हे कर्ज कसे फेडायचे, वर्षभर संसार कसा चालवायचा या विवंचनेत ते सतत होते. दरम्यान, त्यांनी आठवडाभरापूर्वीच १२ ऑक्टोबरला विष प्राशन केले होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी बीड येथे आणले होते. तीन दिवस उपचारानंतर दसऱ्याच्या दिवशी बरे होऊन ते परत आपल्या घरी परतले. मात्र, मनात असलेली निराश त्यांना सोडत नव्हती. पुन्हा त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रूग्णालयाच्या पोलिस चौकीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belgaum Onion Prices : कांद्याच्या दरात 500 रुपयांची वाढ; बटाट्याचे दरही 200 रुपयांनी वधारले, एपीएमसीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक

Dharashiv Crime News: अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधमाविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

बंद पाणी योजना तातडीने सुरू करा, सर्व उपाययोजनानंतर टँकर हा अंतिम पर्याय ठेवा; बावनकुळेंचे निर्देश

Latest Marathi News Update : पुण्यात CBI ची मोठी कारवाई! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त

Jalna News: शेतकरी दुष्काळात, भाजप नेत्याकडून पैशांची उधळपट्टी; माजी आमदारावर उधळल्या नोटा

SCROLL FOR NEXT