Anti-Bribery Squad officials are cracking down on bribery in various places. 
मराठवाडा

भ्रष्टाचार प्रतिबंधक पथक आपल्या दारी; लाचखोरीवर नियंत्रणासाठी एसीबीचा उपक्रम

राजेश दारव्हेकर

हिंगोली : विविध ठिकाणी होत असलेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग पथक अधिकारी आपल्या दारी या मोहीमेंतर्गत अनेक ठिकाणची लाचखोरी उघड करून गुन्हे दाखल केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी अशी लाचखोरी होत असल्यास संबंधितांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विकास विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपाधिक्षक हनुमंत गायकवाड यांनी केले आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग पथक आपल्या दारी या मोहीमेंतर्गत विविध शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी यांनी सरकारी काम करून देतो, असे म्हणून पैशाची मागणी करत असतील तर न भिता भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पथकाशी संपर्क करुन पैसे मागणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विषयी तक्रार करता येणार आहे.  

संबंधित तक्रारदाराचे नाव उघड न करता सरकारी काम तात्काळ करण्यात येणार आहे. या मोहीमेंतर्गत दुय्यम निबंधक कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी, भुमी अभिलेख कार्यालय, ग्राहक तक्रार निवारण मंच, आरोग्य अधिकारी कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, महिला व बालविकास कार्यालय, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय, भुजल सर्वेक्षण कार्यालय, तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, पोलिस अधिक्षक कार्यालय, पुरवठा विभाग, पर्यावरण विभाग, कृषी विभाग यासह अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीवर आळा घालण्यात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपाधिक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे.

अनेक शासकीय कार्यालयामध्ये विविध कामाची अडवणूक करुन त्यातून लाचखोरी करण्याच्या अनेक घटना उघडकीस आहेत. विविध ठिकाणचा भ्रष्टाचार थांबविण्याकरीता भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग पथक आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. लाचेची मागणी करीत असल्यास संबंधीत व्यक्तीस धडा शिकविण्याकरीता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक हनुमंत गायकवाड यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges: PhonePe, Google Pay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; MDR शुल्कांबाबत मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27 : गड आला, पण...! मुंबईने डावाने विजयासह बोनस गुण कमावला, मात्र आयुष म्हात्रे ६ आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला; नेमकं काय घडलं?

संतूर मॉम! रश्मी अनपट आहे आठ वर्षाच्या मुलाची आई; शेअर केले खास फोटो; नेटकरी म्हणाले- याची बायको आली की तू...

४८० सुपर मार्केटमध्ये सायबर हल्ला, फ्रीज आणि फ्रिजरचं तापमान ५० अंशावर, अनेक ठिकाणी लागली आग

Latest Marathi News Live Update : शंकर खंडू पाटील जन्मशताब्दी शासनातर्फे साजरी होणार

SCROLL FOR NEXT