File photo 
मराठवाडा

‘या’ जिल्ह्यात मोफत प्रवेशासाठी दहा हजारांवर अर्ज

नवनाथ येवले

नांदेड :  बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्‍के मोफत प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यातील २४६ शाळांनी सहभाग नोंदविला आहे. मोफत प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी शासन स्तरावरून फेब्रुवारी ते चार मार्च २०२० या कालावधीत ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत होती. त्यानुसार तीन हजार १८० मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातून दहा हजारांवर अर्ज भरण्यात आले आहेत. राज्य स्तरावर प्रवेश मर्यादानुसार एकाच वेळेत ड्रॉ केला जाणार असून लाभार्थींना मोबाइलवर शाळेसह निवडीचा ‘एसएमएस’ मिळणार आहे.

बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्का कायद्यानुसार दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विनाअनुदानित शाळेत पटसंख्येच्या तुलनेत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील २४६ शाळांनी सहभाग नोंदवल्याने एकूण तीन हजार १८० प्रवेशासाठी १३ फेब्रुवारी ते चार मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्जांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार आरटीईच्या संकेत स्थळावर प्रवेशाच्या तुलनेत जिल्हाभरातील दहा हजारांवर म्हणजेच जवळपास तिप्पट पालकांनी अर्ज केले आहेत.

राज्यभरातील नऊ हजार २४५ शाळेत एक लाख १३ हजार ८७९ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाचा लाभ दिला जाणार आहे. शासन स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी बुधवारी (ता. चार) सायंकाळपर्यंत शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू होती. दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यांत लॉटरी काढण्यात येते. गेल्यावर्षी एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी प्रवेश प्रक्रिया सुरूच होत्या. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य पालकांना बसला होता. यामध्ये पालकांना सोयीच्या शाळा मिळाल्या नसल्यामुळे बहुसंख्य जागा रिक्तच राहिल्या. त्यामुळे अनेक पालकांनी या प्रवेशाकडे कानाडोळा केला होता. त्या सर्व अडचणींवर तोडगा काढण्यासाठी यंदा एकदाच प्रवेशाची लॉटरी काढण्यात येणार आहे.

दलालांची चांदी
मोफत प्रवेश प्रक्रिया राज्य स्तरावरून राबविण्यात येत असली तरी ग्रामीण भागात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली दलालांकडून पालकांची लूट होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, गरजू पालकांना प्रवेशाचे आमिष दाखवून ऑनलाइन प्रक्रियेत चुकीचे लोकेशन दाखविण्याचा प्रकार वाढत आहे. मोफत प्रवेशाच्या आमिषाने पालक मागेल तो दाम हातावर टेकवत असल्याने दलालांची चांदी झाली आहे.

...तर प्रवेश होईल रद्द
मोफत प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेनुसार ड्रॉ पद्धतीने मिळालेल्या प्रवेशाची तालुका स्तरावर प्रवेश समितीकडून तपासणी करण्यात येणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेमध्ये घर आणि शाळांचे अंतर चुकीचे दाखविल्याची तक्रार दाखल केल्यास समितीकडून त्याची खातरजमा होणार आहे. शाळेच्या एक किलोमीटर अंतरातील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य राहणार असल्याने दोषी आढळल्यास समितीकडून प्रवेश रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Humanity Helps: नाझियाच्या मदतीला धावली माणुसकी! ती सहा महिन्यांपासून देतेय आजाराशी झुंज; उपचारासाठी लाखोंचा खर्च..

Ambajogai Crime : कला केंद्रात कामाचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

SCROLL FOR NEXT