Loksabha Election 2024 sakal
मराठवाडा

Loksabha Election 2024 : शिवराज पाटील यांचा वारसा आता भाजपमध्ये ; अर्चना पाटील चाकूरकर यांचा पक्षप्रवेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या रूपाने त्यांचा वारसाच भाजपकडे आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नमूद केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या रूपाने त्यांचा वारसाच भाजपकडे आला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नमूद केले.

अर्चना पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व भाजप नेते मुंबईत हजर होते. उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निठुरे यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला.

आम्ही गेली दहा वर्षे अर्चना पाटील यांच्या संपर्कात आहोत .२०‍१९ मध्ये त्यांना भाजपतर्फे निवडणूक लढवण्याची विनंती केली होती,’’ असे संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी सांगितले. अर्चना पाटील म्हणाल्या,

‘‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली प्रगती मी गेली दहा वर्षे पाहत आहे. भारताला पुढे नेणारी ही दमदार वाटचाल आहे. संसदेच्या नव्या वास्तूत ज्या दिवशी प्रवेश झाला त्या दिवशी नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाले. त्यावेळी मी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT