Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Maratha Reservation: जरांगेशी खोतकरांची पुन्हा चर्चा पण तोडगा नाहीच.. सरकारचे शिष्टमंडळ येणार भेटीला

सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी गावात चर्चेसाठी जाणार तोडगा निघणार का? याकडे लक्ष

अंकिता खाणे (Ankita Khane)

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद आजही राज्यभरात दिसून येत आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये आजही बंदची हाक देण्यात आली आहे. बंदला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचा मोठा फटका एसटी बसला झाला आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा दिसून येत आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. सरकारने उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.

त्याचबरोबर आज पुन्हा एकदा सरकारचे प्रतिनिधी म्हणून अर्जुन खोतकर यांनी जालन्यामध्ये जाऊन आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे. कालही अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करुन दिलं होतं. आजही खोतकरांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर आज सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाणार आहे. आज तरी यावर तोडगा निघतो का ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

मनोज जरांगे यांच्यासह उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आज (5 सप्टेंबर) सरकारच्या शिष्टमंडळ भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि उदयनराजे भोसले हे आहेत. याआधीही गिरीश महाजन यांना पाठवून सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र महाजन यांना यश आलं नव्हते. त्यामुळे आज दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये आज पुन्हा पावसाला सुरुवात

Mumbai News: आरामदायी गाड्यांवर महापालिकेची उधळपट्टी! पदाधिकाऱ्यांवरील २ कोटी १६ लाखांचा खर्च वाया, नव्या गाड्या सहा महिन्यांत आवडेनाशा

SCROLL FOR NEXT