NND19A89241 
मराठवाडा

कला आमच्या रक्तामासात भिनली

शिवचरण वावळे

नांदेड ः लहान होतो तेव्हा लोककलेचे आकर्षण निर्माण झाले. आणि वयाच्या दहा-बारा वर्षीपूर्वी भिमा-भिका सांगवीकर यांच्या लोककला संचात दाखल झाले. तसे बघितले तर, मागे पुढे आई वडील कुणीही नव्हते, म्हणून भंगार वेचणे आणि भिक मागण्याचे काम करून गुजरान सुरू होती. पोटासाठी भिक मागण्याऱ्या छबुची गुजराण ‘भिमा भिकानी’ थांबविली, त्यामुळे शासनाने काय दिले आणि काय नाही दिले, या बद्दल आत्ता फारशी खंत वाटत नाही. कला आमच्या रक्तामासात भिनल्याचे या वेळी लोककलावंत छबुबाइ लाखे यांनी सांगितले.


वयाच्या दहाव्या वर्षी इथे आले अन् लग्न करायचेच विसरुन गेले, आत्ता मात्र लोककलेशीच माझे लग्न झाले. वयाचीसाठी गाठलेली छबु लाखेंनी यांनी ‘सकाळ’कडे आपल्या आयुष्यातील कटु गोड आठवणींना उजाळा देताना. अनेक कटु व गोड आठवणी सांगितल्या. 

छबुबाई कलासंचात गायक
छबुबाई ह्या भिमा भिका सांगवीकर यांच्या कलासंचात गायक आहेत. लोककलावंत म्हणून शासनाकडे अनेक वेळा कागदपत्रे पाठविली पण काय झाले कुणास ठाऊक आजपर्यंत मला एक नुखरी सुद्धा मिळाली नाही. पण मला त्यांच्या मानधनाची फारशी चिंता वाटत नाही. भिमा भिकांच्या लोककला संचात राहुन जे मिळते ते माझ्या भावांच्या मुलांवर खर्च करते. कारण त्यांच्याशिवाय मला आज कुणीही नाही म्हणून तेच माझा सांभाळ करतात. लोककला संचासमोबत दसऱ्याला घराबाहेर पडायचे ते वैशीखी पौर्णिर्मेला गावी परत यायचे आणि सात महिण्यापर्यंत केलेल्या कमाईवर बसून खायचे असे आयुष्य सुरू आहे.

मनोरंजन करण्यातच कलाकारांचे आयुष्य संपते
लोकांचे मनोरंजन करण्यातच कलाकारांचे आयुष्य संपून जाते. अशा या कलाकारांचा शासन दरबारी क्वचितच मान सन्मान होतो. मात्र पूर्वी जिथे जाईल तिथेल्या गावची लोक कलेचे आणि कलाकाराचा आदर सन्मान करायची. तो आज आदर सन्मान मिळत नाही. लोककला बघायला आलेले रसिक कलाकारांच्या आदाकारीने घायाळ होत. 

कला आमच्या रक्तामासात भिनली
कलेला टाळ्या अन् शिट्यांची दाद देत, रसिकांमधुन खडे सुद्ध स्टेजवर येत नव्हता. आज मात्र कलाकारांच्या स्टेज समोर उभे राहुन लोक कलाकारांना शिव्या घालतात. त्यामुळे आम्ही आता कलेत मरलो आहोत. कला आमच्या रक्तामासात भिनली आहे. पण लोककला जिवंत ठेवण्यासाठी नवीन पिढी मात्र रसिकांची मानसिकता बघुन लोककलेसाठी आयुष्य जगण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. त्यामुळे लोककलेची भविष्यातील दिशा या असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आयुष्यात आईवडील गमावल्याचे आणि त्यांच्या पुढे लग्न न झाल्याने मी बिन लग्नाची राहिल्याचे सर्वात दुःख वाटते. कलेतुन थकवा येतो तेव्हा मात्र आपले मुलबाळ असावीत असे वाटते पण हे आता शक्य नाही. कलेच्या साथीने जगले कलेच्या साथीनेच मरणार, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT