Ashti Ashti
मराठवाडा

बीडमध्ये कडक लॉकडाउन असतानाही 'अर्धे शटर' जोरात

शासनाच्या नियमाला खो, कोरोनाला दिले जात आहे आमंत्रण

निसार शेख

आष्टी (बीड:) तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महसूल आरोग्य व पोलिस प्रशासन सर्वतोपरी प्रतिबंधक उपाययोजना राबवत आहे. पण, आष्टी व कडा या शहरात मात्र शासन नियमावलीचे व्यावसायिक व काही दुकानदार सर्रास उल्लंघन करीत असून, कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त काही व्यावसायिकांनी दुकानाची अर्धे शटर उघडून अक्षरश: बाजार मांडला आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये ही ठिकठिकाणी गर्दी होताना दिसत असून, कोरोनाला आमंत्रण मिळत आहे.

आष्टी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांचा आकडादेखील बेशिस्त नागरिकांच्या वर्तनामुळे कमी होताना दिसत नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी आरोग्य, महसूल व पोलिस प्रशासन सर्वतोपरी प्रतिबंधक उपाययोजना करीत आहेत. मात्र, काही नागरिकांसह काही व्यापाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आष्टी व कडा येथे लॉकडाउन असूनही अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त अनेक दुकानदार राजरोसपणे तोंडाला मास्क न लावता दुकानाचे अर्धे शटर उघडून पैसे गोळा करीत आहेत.

त्यामुळे बाजारपेठेत सकाळपासूनच अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास अनुकूल वातावरणाची निर्मिती होत असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अन् पळापळ सुरू झाली

कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मार्केटयार्ड व केरूळ रोड परिसरात तसेच मुख्य बाजारपेठ परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याची माहिती आष्टीचे नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांना समाजताच त्यांनी कडा येथे धाव घेतली. तहसीलचे पथक पाहताच नागरिकांची पळापळ सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सलग सहाव्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात आजचा ताजा भाव किती? जाणून घ्या

IND vs AFG: भारतीय संघ निवडताना BCCI केलीय मोठी चूक; आयर्लंड, इंग्लंडपाठोपाठ अफगाणिस्तानही अय्यरच्या संघाला लोळवणार

Mumbai News: VIPसाठी सामान्य नागरिकाला ढकललं, पोलिसांनी सायकल दिली फेकून; Video Viral

Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : नोकरीची सुवर्णसंधी! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत 67 लिपिक पदांची भरती; TCS मार्फत होणार परीक्षा, 'हे' प्रमाणपत्र असणे बंधनकारक

Marathi News Live Updates : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी घडामोड; CBI चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT