file photo
file photo 
मराठवाडा

संस्था, संघटना सरसावल्या....

सकाळ वृत्तसेवा

परभणी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि देशात लॉकडाउन करण्यात आले. एक - दोन दिवस नव्हे, तर तब्बल २१ दिवसांचे लॉकडाउन झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांसमोर रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. कोरोनासारख्या महाभंयकर संकटाच्या वेळी मात्र, माणुसकी धावून आल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसत आहे. जो तो गोरगरीब, गरजवंतांना अन्नधान्याचे वाटप करतांना दिसत आहे. 

श्री सिद्धिविनायक संस्थेतर्फे ५१ हजाराची मदत
सेलू (जि.परभणी) :
सेलू शहरातील श्री सिद्धिविनायक संस्थानने कोरोनाचा उपाययोजनेसाठीचा मुख्यमंत्री साहयता निधीला ५१ हजार रुपयाची मदत केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दानशुर व्यक्ती, संस्था आदीनी शासनास मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. दरम्यान, सेलू शहरातील गणपती गल्लीतील श्री सिद्धिविनायक संस्थानने मुख्यमंत्री साहायता निधी म्हणून ५१ हजार रुपयाचा धनादेश येथील उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्फत शासनास दिला आहे. या वेळी संस्थानचे भागचंद मालाणी, सुभाष भरदम, श्रीनिवास झंवर, सुभाष राठी आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - चित्रकारांची पेटिंगमधून ‘कोरोना’ जनजागृती


दत्तात्रय सोळंके यांनी दिले पन्नास हजार....
 कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा उपाययोजनेसाठीचा मुख्यमंत्री साहयता निधीला श्री राम कंस्ट्रक्शनचे दत्तात्रय रमेशराव सोळंके यांनी  ५० हजार रुपयाची मदत केली. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहायता निधीला सामाजिक बांधिलकी म्हणून पन्नास हजार रुपयाचा धनादेश दत्तात्रय सोळंके यांनी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्फत शनिवारी (ता.४) शासनास दिला आहे. या वेळी तहसीलदार बालाजी शेवाळे उपस्थित होते. 
देशात व राज्यात कोव्हीड-१९ सारख्या महाभयंकर विषाणू मुळे थैमान घातले असुन अशा वेळी मुख्यमंत्री साहयता निधीला दत्तात्रय सोळंके यांनी केलेल्या पन्नास हजार रुपयाच्या सहकार्याबद्दल उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी त्यांना प्रशासनाच्या वतीने आभार पत्र दिले.
 

कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वस्तुंचे वाटप
सोनपेठ (जि.परभणी):
कोरोना मुळे अडकुन पडलेल्या मजुरांसोबतच शहरातील गरजु कुटुंबांना सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप सभापती राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गरजु कुटुंबांना पीठ, तांदुळ, दाळ तेल या सह पंधरा दिवस पुरेल एवढे आवश्यक ते साहित्य कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वाटप करण्यात आले. ता. ३ रोजी बाजार समितीच्या आवारात सभापती विटेकर यांच्या हस्ते सोशल डिस्टंसींग पाळत हे वाटप करण्यात आले. या वेळी बाजार समितीचे संचालक अमर वडकर, दिलीप सातभाई, बाजार समितीचे सचिव घोबाळे, नगरसेवक डॉ. श्रीनिवास गुळभिले, सुनील बर्वे यांच्या सह शिवाजी भोसले, सुधीर बिंदू, कृष्णा पिंगळे, गणेश पाटील, सुभाष सुरवसे तसेच बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

चारठाणा सर्कलमधील २२ गावांत फवारणी
चारठाणा (जि.परभणी):
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेवून जिल्हा परिषद सदस्या मीना राऊत यांनी चारठाणा सर्कलमध्ये गुरूवारी (ता. दोन) सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाच्या फवारणीस मानकेश्वर येथून सुरवात करण्यात आली आहे. सर्कलमधील २२ गावात फवारणी करण्यात येणार असून यासोबतच कोरोनाबाबत जनतेमध्ये जागृती करण्यात येत आहे. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बोराळकर, राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राऊत, वैद्यकीय अधिकारी शेख माजिद, उपसभापती शरद मस्के, सरपंच बी. जी. चव्हाण, मधुकर भवाळे, उपसरपंच तैहसीन देशमुख, सलीम काजी, कृष्णा कान्हेकर, सरपंच विजय गडदे, रावसाहेब बिरगळ, एम. के. शाक्य, विष्णू वानखरे, यांच्यासह आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या फवारणीसाठी कृष्णा कान्हेकर यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, चारठाणा सर्कल मधील मानकेश्वर, सोस, सोनापूर, रायखेडा, पाढरगळा, राजेगाव, भांबरी, रायखेडा, जांब (बु.) जांब खु., हलविरा, पिंपरी, मोळा, कान्हा, भागूनाईक तांडा, सायखेडा, सायखेडा तांडा अशा २२ गावांमध्ये फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या मीना राऊत यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT