file photo 
मराठवाडा

न्यायालयाच्या आदेशावरून ॲट्रीसीटी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : गरीब शेतकऱ्याची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्यांसह त्याच्या दोन भावांविरूद्ध ॲट्रॉसीटी कायद्यानुसार भोकर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याचा आदेश भोकर न्यायालयाने दिला. 

भोकर ते मुदखेड रस्त्यावर पांढूर्णा शिवारात गरीब शेतकरी माधव अर्जून गायकवाड यांचे शेत आहे. परंतु या शेतावर मागील काही दिवसांपासून त्यांचा शेत शेजारी व राजकीय पुढारी असलेला बालाजी शिंदे याचा डोळा होता. शेत विकत विकावे म्हणून श्री. शिंदे त्याला त्रास देत होता. यातून त्यांचे वाद होत असत. एवढेच नाही तर माधव गायकवाड यांचे जवळपास २० फुट शेत अतिक्रमण करून ताब्यात घेतले होते. या प्रकरणाची वाच्यता व्हावी व न्याय मिळावा म्हणून त्यांने अनेकवेळा सरकारी कार्यालयात दाद मागितली. परंतु राजकिय पक्षाचा पुढारी असल्याने तो यातून नेहमी वाचत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून माधव गायकवाड यांनी भूमीअभेख कार्यालयात शेतीच्या मोजणीसंदर्भात अर्ज करून रितसर सरकारी फीस जमा केली. मोजणी झाली त्यावेळी २० फउटे सेत बालाजी शिंदे यांच्या कब्जात दिसले. 

न्यायालयाचा निकाल

एवढेच नाही तर परस्पर श्री. शिंदे यांनी शेतातून नाला खोदून शेतीची वाटणी झाल्याचे स्वत:च सांगत असे. तशी शासकिय अभिलेखावर नोंद आहे. तीन एकर ७७ आर जमीनीतून जर ती जमीन गेली तर शेत कसे करावे म्हणून हतबल झालेले माधव गायकवाड यांनी भोकर न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक ३१/२०१९ दाखल केला. भोकर न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांनी या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास केला. 

भोकर पोलिस ठाण्यात शिंदे बंधूवर गुन्हा

एकंदरीत कागदपत्रांच्या पुराव्यावरून त्यांनी अखेर माधव गायकवाड यांना न्याय देत त्यांना त्रास देणाऱ्या बालाजी विश्‍वनाथ शिंदे, रामकिशन विश्‍वनाथ शिंदे आणि माधव विश्‍वनाथ शिंदे यांच्याविरुद्ध अनुसूचीत जाती- जमाती प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश भोकर न्यायालयाला दिले. यावरून भोकर पोलिस ठाण्यात माधव गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन वरील तिघांवर गुन्हा दाखल केला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पी. मुदीराज करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT