Babanrao Lonikar 
मराठवाडा

कोर्टाच्या आदेशाशिवाय धाड टाकल्याने प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याला लोणीकरांनी झापले, ऑडिओ क्लिप व्हायरल

ई सकाळ टीम

जालना : जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका व्यापाऱ्याच्या घरावर प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने धाड टाकली आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर संतापलेल्या श्री.लोणीकरांनी परतूरचे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना फोन करुन न्यायालयाच्या आदेशाशिवाय व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या धाडीबाबत विचारणा केली. तसेच विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगत भाजपचे १०५ आमदार विधानसभेचं कामकाज चालू देणार नसल्याचा इशाराही देऊन टाकल्याचा ऑडिओ क्लिप चार दिवसांपूर्वीच व्हायरल झाली आहे. 


परतुरमध्ये ओमप्रकाश मोर यांचे किराणा दुकान आहे. या किराणा दुकानातून गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हसन गौहर यांनी पोलिसांचे पथक सोबत घेऊन धाड टाकली. पण धाडीत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. धाड टाकताना पोलिसांकडे कोर्टाचे ऑर्डर नसल्यानं आमदार लोणीकर यांनी पोलीस अधिकारी गौहर यांची चांगलीच खरडपट्टी काढली. गौहर हे बिहारमधील रहिवासी आहेत. याचा उल्लेख करत लोणीकरांनी हा महाराष्ट्र आहे बिहार नाही असे ठणकावून सांगत महाराष्ट्रात तुमची गुंडागिरी चालणार नाही असेही गौहर यांना सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 30 जूनपूर्वी 'हे' काम न केल्यास पुढील 2,000 रुपयांचा हप्ता अडकणार; कृषी विभागाचा इशारा

Fan Cooling Tips : सीलिंग फॅनची स्पीड कमी झालीये? नवीन पंखा विकत घेण्यापूर्वी करून बघा 'हे' काम, येईल एसीसारखी थंड हवा

FIFA WORLD CUP 2026: मृत्यूला हरवून 'तो' मैदानावर उतरला; वर्ल्ड कपमध्ये पहिला गोल करताच ढसाढसा रडला... कोण आहे Raúl Jiménez?

Latest Marathi News Live Update : काँग्रेस बुडणारं जहाज, विलिनीकरण झालं तरी आम्हालाच फायदा होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला

आता IRCTC वेबसाईट हँग होणार नाही! १५ जुलैपासून नवी प्रणाली लागू; तत्काळ तिकीट बुकिंगचा त्रास संपणार?

SCROLL FOR NEXT