मराठवाडा

कचरा डेपोच्या जागेचे काउंटडाऊन सुरू

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - नारेगाव कचरा डेपोत येत्या १६ जानेवारीनंतर कचरा न टाकू देण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. यामुळे शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नावरून पुन्हा भंबेरी उडणार आहे. महापालिका प्रशासनाने कचरा डेपोसाठी पर्यायी जागेचा पुन्हा शोध सुरू केला आहे. कचरा टाकण्यासाठी आडगाव येथील खदानीची जागा देण्यात यावी, असे पत्र महापालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. 

गेल्या तीस वर्षांपासून नारेगाव येथील कचरा डेपोत शहरातील कचरा नेऊन टाकला जातो. त्यामुळे तिथे आता कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. परिणामी, येथे दुर्गंधी आणि मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. कचऱ्यामुळे परिसरातील हवा, पाणी प्रदूषित झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे हा कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी नारेगाव परिसरातील तेरा गावांमधील ग्रामस्थांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलन छेडले होते. सलग तीन दिवसांत कचरा डेपोत कचऱ्याचा एकही ट्रक जाऊ दिला नाही. शेवटी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी केल्यावर आंदोलकांनी महापालिकेला तीन महिन्यांची मुदत देत हे आंदोलन मागे घेतले. आता ही मुदत १६ जानेवारीला संपत आहे; परंतु कचऱ्याचा प्रश्‍न मिटलेला नाही. त्यामुळे नारेगाव पंचक्रोशीतील नागरिकांचे शिष्टमंडळ शुक्रवारी (ता.पाच) महापालिकेत गेले होते. या शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल हेही उपस्थित होते.

कुठल्याही परिस्थितीत १६ जानेवारीपासून डेपोत कचरा टाकण्यासाठी येणारी वाहने बंद करण्यात यावीत, असे या शिष्टमंडळाने महापौरांना सांगितले. त्यानंतर महापालिका प्रशासन पर्यायी जागेच्या शोधासाठी कामाला लागले आहे. महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांच्या आदेशावरून महापालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला पत्र दिले असून, त्यात कचरा टाकण्यासाठी आडगाव येथील खदानीची जागा देण्याची विनंती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT