मराठवाडा

बिल भरा अन्यथा पाणीपुरवठा योजनेची वीज कट 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - महापालिकेने थकबाकी सोडून किमान चालू महिन्याचे अडीच कोटी रुपयांचे वीज देयक २४ तासांत भरावे अन्यथा पाणीपुरवठा योजनेची वीज जोडणी कापू, असा इशारा महावितरणने महापालिका प्रशासनाला नोटीसद्वारे दिला आहे. यावर महापालिका प्रशासनाने वेळीच मार्ग काढला नाही तर शहरावर पाणीसंकट येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, तत्काळ वीजबिल भरण्याचा आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी लेखा विभागाला दिला.

जायकवाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महापालिकेच्या दोन पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. जायकवाडी धरणाच्या तुलनेत शहर अधिक उंचीवर आहे. परिणामी, विद्युतपंपांच्या मदतीनेच तेथून शहराकडे पाणी आणावे लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो. या पाणीपुरवठा योजनेवरील वीजबिलापोटी महापालिका प्रशासनाला वर्षाकाठी सरासरी ३४ कोटी रुपयांचे बिल भरावे लागते. महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे ऑक्‍टोबर महिन्याचे अद्याप वीजबिल भरलेले नाही. महापालिकेकडून दर महिन्याच्या एक तारखेला हे वीजबिल भरले जाते; मात्र या महिन्यात काही कारणांमुळे महापालिकेने २ कोटी ५३ लाख रुपयांचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे आता महावितरणने महापालिका प्रशासनाला नोटीस बजावली आहे. महापालिका प्रशासनाने २४ तासांत चालू महिन्याचे वीजबील भरावे अन्यथा पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. महावितरण कंपनीच्या नोटीसची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिरिक्त आयुक्त आणि लेखा विभागाचे अधिकारी यांच्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी बुधवारी (ता. २२) हे बिल भरण्यात यावे, असा आदेश लेखा विभागाला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT