औरंगाबाद : इंटरनॅशनल सेंटर फॉर इन्टरप्रेनरशिप अँण्ड टेक्नोलोजी (आय क्रिएट) आणि मराठवाडा अॅक्सीलेटर फॉर ग्रोथ अॅण्ड इन्क्यूबेशन कॉन्सील (मॅजिक) यांच्यातर्फे ईलेक्ट्रीक व्हेकल इनोव्हेशन चॅलेंज अर्थात इव्हॅजलाईज २१ आणि व्हर्च्युअल रोड शो चे ३ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ईलेक्ट्रीक वाहनांना चालना मिळावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी मॅजिक या स्पर्धेचा प्रादेशिक आयोजक असणार आहे.
जागतिक तापमान आणि वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक अर्थात विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे जागतिक दळणवळण यंत्रणेत क्रांती घडून येऊ शकते हे लक्षात घेऊन इलेक्ट्रिक व्हेईकल इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. इव्हॅजलाईज-२१ आणि ३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल रोड शो साठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक व्हेकल्सची कल्पना, डिझाईन आणि प्रत्यक्ष बांधणी अशा तीन वेगवेगळ्या टप्प्यात ही स्पर्धा होणार आहे. इच्छुक स्पर्धक कोणत्याही टप्प्यासाठी नावनोंदणी करू शकतात तिन्ही टप्प्यातील विजेत्यांना स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत. ईव्ही एक्स्पो, इलेक्ट्रिफाय युवर फ्यूचर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी ईव्ही रेस या तीन कार्यक्रमांमधून स्पर्धकांना आपले ई-व्हेकल मधील कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. भारतात येऊ घातलेल्या ई-व्हेकल्सच्या क्रांतीचा एक भाग होण्यासाठी ही स्पर्धा एक महत्वाची संधी ठरणार आहे. इव्हॅजलाईज-२१ चा प्रादेशिक भागिदार म्हणून मॅजिक काम पहात आहे. व्हर्चुअल रोड शो मध्ये सहभागी होण्यासाठी, अधिक माहितीसाठी www.EVangelise.org.in या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन मॅजिक तर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.