10 members of same family test Coronavirus positive in Gajanan Colony 
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus : औरंगाबादेतील गजानन कॉलनीमध्ये एकाच घरात दहा रूग्ण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी (ता. चार) विद्यानगर भागातील गजानन कॉलनी येथील एकाच घरातील दहा रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली. घरातील एक सदस्य पोलिस दलात असून, त्यांच्यामार्फत घरातील तेरापैकी दहा जण बाधित झाले आहेत. 

शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत असून, प्रत्येक वसाहती आणि वॉर्डात बाधित रुग्ण सापडत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे. त्यातच ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत असल्याने दररोज हा आकडा दोनशेपेक्षा अधिक आहे. आत्तापर्यंत ६४६० एवढी बाधितांची संख्या झाली असून, त्यापैकी ३१२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. २८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सध्या ३०४७ रुग्णांवर उपचार सूरू आहेत. दरम्यान शनिवारी १९६ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १५२ रुग्ण शहरातील आहेत. दरम्यान विद्यानगर वॉर्डात एकाच कुटुंबातील १० जणांना बाधा झाली. त्यानंतर शिवसेनेचे विधानसभा पूर्व संघटक तथा या वॉर्डाचे माजी नगरसेवक राजू वैद्य यांनी तातडीने या भागाला भेट दिली. एकाच घरात दहा कोरोनाबाधित सापडल्यामुळे नागरिकांना घाबरून न जाण्याचे त्यांनी आवाहन केले. कोणत्याही जीवनावश्यक वस्तूची गरज भासल्यास लगेच उपलब्ध करून देण्यात येईल. खूपच गरज असेल तर घरातील एका व्यक्तीने घराबाहेर निघावे असे आवाहन केले. वॉर्डात ज्या गल्लीत रूग्ण सापडले आहेत ती गल्ली व आजूबाजूचा सर्व परिसर तातडीने निर्जंतुकीकरण करून सील करण्यात आला. 
 
आणखी एका माजी नगरसेवकाला कारोना 
महापालिका कर्मचाऱ्यांपाठोपाठ माजी नगरसेवकांना देखील कोरोनाचा विळखा पडत आहे. शिवसेनेचे आणखी एक माजी नगरसेवक कोरोनाबाधित झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी शिवसेनेच्याच दोन नगरसेवकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवसेनेचे पडेगाव भागातील माजी नगरसेवक पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बौद्धनगर भागातील एका माजी नगरसेवकावर उपचार सुरू आहेत. आता बन्सीलालनगर भागातील एका नगरसेवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजपच्या एका माजी महापौरांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. 

भगवान बुद्धांनी जगाला जगण्याचा मार्ग दाखवला : मोदी
 
विठ्ठलनगर, हर्सूल, सिडको नवे हॉटस्पॉट 
शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरूच असून, गजानन कॉलनी, मिसारवाडी, विठ्ठलनगर, हर्सूल, सिडको, बजरंग चौक, उस्मानपुरा, कांचनवाडी, बापूनगर हे भाग शनिवारी (ता. चार) नवे हॉटस्पॉट ठरले आहेत.  शहरात शनिवारी १५२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. गजानन कॉलनीमध्ये दहा, मिसारवाडीत आठ, विठ्ठलनगर अकरा, हर्सूल तीन, सिडको सात, कांचनवाडी चार, बजरंग चौक तीन, गुलमोहर कॉलनी पाच, कोकणवाडी तीन, अरिहंतनगर पाच, उस्मानपुरा तीन, बापूनगर पाच असे रुग्ण आढळून आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसामुळे मिळालेल्या मदतीची रक्कम वजा करून मदत दिली जात - संजय पाटील घाटणेकर

पिंम्पल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची... शिवानीला झालेल्या ट्रोलिंगवर अमित म्हणतो- तिच्या चेहऱ्यावर लिच लावले...

Tomorrow Horoscope Prediction : उद्या तयार होतोय अत्यंत शुभ सर्वार्थ सिद्धी योग, 5 राशींवर भगवान विष्णूची कृपा

SCROLL FOR NEXT