water storage in marathwada dams sakal
छत्रपती संभाजीनगर

Water Storage : मराठवाड्यात केवळ ११.७० टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत जायकवाडीत ३५ टक्के घट

मराठवाड्यातील धरणांची स्थिती चिंताजनक झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यातील धरणांची स्थिती चिंताजनक झाली आहे. विभागातील ८७७ मोठे, मध्यम व लहान प्रकल्प आणि बंधाऱ्यांमध्ये अवघा ११.७० टक्के पाणीसाठा आहे. या सर्वांची पाणी साठवण क्षमता ८१५५ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. मात्र, सध्या या प्रकल्पांमध्ये केवळ ९५३ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.

मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेल्या जायकवाडी धरणात फक्त ६ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा गेल्यावर्षीच्या २४ मेच्या तुलनेत तब्बल ३५ टक्क्यांनी कमी आहे, तर पाच मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठला आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाकडून माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १५ जुलैपर्यंत पुरेल, असे नियोजन केल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये १४.३५ टक्के पाणीसाठा आहे. या मोठ्या प्रकल्पांचा संकल्पित पाणीसाठा ५,१५६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. मात्र, त्या तुलनेत सध्या ७४० दशलक्ष घनमीटर म्हणजे १४.३५ टक्के साठा आहे. मध्यम व लघू प्रकल्पांची तर भयंकर स्थिती आहे.

७५ मध्यम प्रकल्पांमध्ये ५.८५ तर ७४९ लघू प्रकल्पांमध्ये ६.७१ टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये १३.०५ टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ५ टक्के पाणीसाठा राहिलेला आहे. अशा स्थितीत या प्रकल्पांवरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत.

मध्यम प्रकल्पांची आकडेवारी

विभागात ७५ मध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११ प्रकल्पांचे पाणी जोत्याखाली गेले आहे; तसेच जालना, बीड प्रत्येकी पाच, लातूर ४, धाराशिव ११, परभणी दोन तर नांदेडमध्ये एका प्रकल्पाचे पाणी जोत्याच्या खाली गेले आहे; तसेच जालना एक, बीड तीन, धाराशिवमधील दोन असे सहा मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

विभागातील २४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी राहिले आहे, तर २५ ते ५० टक्के आणि ५० ते ७५ टक्के पाणी प्रत्येकी तीन मध्यम प्रकल्पांमध्ये राहिल्याचे जलसंपदा विभागाच्या २४ मेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लघू प्रकल्पांची आकडेवारी

विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये १६६ लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर ३५९ प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक २०६ लघू प्रकल्प आहेत. यापैकी ७४ लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर ९२ प्रकल्पांतील पाणी जोत्याच्या खाली गेले आहे.

बीड जिल्ह्यातील ४९ प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर ४८ प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. छत्रपती संभाजीनगरात १८ प्रकल्प कोरडे, तर ३६ प्रकल्प जोत्याखाली, जालना जिल्ह्यात १४ कोरडे तर ४३ जोत्याखाली, लातूरमध्ये ११ कोरडे व ७८ प्रकल्प जोत्याखाली आहेत.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत प्रत्येकी क्रमशः २९, १८ आणि १५ प्रकल्प जोत्याखाली आहेत. विभागातील १६६ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ४२ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के पाणी आहे. १६ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा असून, केवळ लातूर जिल्ह्यातील एका लघू प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT