20 years imprisonment in case of minor girl abuse crime marathi news chhatrapati sambhajinagar
20 years imprisonment in case of minor girl abuse crime marathi news chhatrapati sambhajinagar  Esakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar Crime : प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करून तिच्या ओठांना चटके देणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली एक लाख ६१ हजार रुपयांची दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली. आरोपीला ठोठावण्यात आलेल्या दंडाच्या रकमेपैकी ४० हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

परमेश्‍वर कचरू बांबर्डे असे नराधमाचे नाव आहे. प्रकरणात सात वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार घटनेच्या दहा वर्षे आधीपासून फिर्यादी व आरोपीचे परमेश्‍वर बांबर्डे यांच्यात प्रेमसंबंध होते.

दरम्यानच्या काळात पीडितेचे लग्न होऊन तिला सात आणि पाच वर्षांच्या मुली आहेत. घटनेच्या दहा महिन्यांपूर्वी प्रेमसंबंधाची फिर्यादीच्या पतीला माहिती झाल्यानंतर त्याने फिर्यादीला सोडून दिले. तेव्हापासून फिर्यादी ही तिच्या मुलींसह आरोपीसोबत राहत होती.

तर पीडिता आरोपीला काका म्हणायची. २३ ऑगस्ट २०२२ ला फिर्यादी ही पहाटे पाच वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे कंपनीत गेली होती. तेव्हा पीडिता, तिची लहाण बहीण व आरोपी असे घरी होते. संधी साधत आरोपीने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला.

त्यानंतर तिच्या ओठांना चटका देवून ‘तू तुझ्या आईला काही सांगू नको’, अशी धमकी दिली. फिर्यादी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरी आली होती, तर पीडिता ही दुपारी शाळेत गेली होती.

रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडितेच्या ओठांना दुखापत झाल्याने फिर्यादीने तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडलेली घटना सांगितली. फिर्यादीने याबाबत आरोपीकडे चौकशी केली असता त्याने फिर्यादीला मारहाण करून तिला पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यात तपास अधिकारी उपनिरीक्षक प्रतिमा अंबुज यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात मुख्य जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी प्रकरणात सात साक्षीदार तपासले.

अ‍ॅड. देशपांडे यांनी न्यायवैद्यक अहवाल, पीडितेचा जबाबा सारखे महत्वाचे पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवी कलम ३७६ (एफ) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, कलम ३५४(बी) अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड,

कलम ३२३ आणि ५०६ अन्वये अनुक्रमे एक महिना आणि तीन महिने सक्तमजुरी, पोक्सोच्या कलम ६ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड, कलम ८ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड,

कलम १२ अन्वये तीन महिने सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, बाल न्याय हक्काच्या सेक्शन ७५ नूसार २० वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी सहायक फौजदार रज्जाक शेख यांनी अ‍ॅड. देशपांडे यांना सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT