ग्रामपंचायत निवडणूक, सरपंच  
छत्रपती संभाजीनगर

वैजापुरात २८६ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची पदे आता धोक्यात

एक वर्षाची मुदत संपली : जात वैधता प्रमाणपत्र देण्यात अपयश

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर : आरक्षित जागेतून ग्रामपंचायत निवडणूक जिंकणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांनी एक वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे ३८८ पैकी केवळ १०२ सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र तहसील कार्यल्यात सादर केले आहेत. परंतु, अजूनही २८६ जण बाकी आहेत. त्यामुळे अश्या सदस्यांचे पद आता धोक्यात आले आहे.

तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी २०२१ मध्ये पार पडल्या. त्यात ९०७ ग्रामपंचायत सदस्यांमधून ३८८ सदस्य आरक्षित प्रवर्गातून निवडून आले. अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व अन्य आरक्षित प्रवर्गातील सदस्यांचा यामध्ये समावेश आहे.निवडणूक जिंकल्यानंतर आरक्षित प्रवर्गातील सदस्यानी एक वर्षाच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करावा लागतो. त्यानुसार १०२ ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक विभागाकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले. मात्र, २८६ सदस्य १८ जानेवारी २०२२ पर्यंत दिलेल्या मुदतीच्या आत पडताळणी प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत. त्यामुळे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. तहसील कार्यालयातून अश्या सदस्यांची आता माहिती गोळा करने सुरु झाले असून.

जात पडताळणी प्रमाण सादर करण्यास सद्यस्थितीत एक वर्षाची मुदत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मुदतीत वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. निवडणूक विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केल्यास तालुक्यातील २८६ ग्रामपंचायत सदस्यांना घरी बसावे लागणार आहे.

२९ नोव्हेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली. पूर्वी सहा महिन्यांचा कालावधी होता. ग्रामविकास विभागाकडून तोच कालावधी १२ महिन्यांचा करण्यात आला. निवडणुकीपूर्वी अर्ज भरणाऱ्यांनी एक वर्षाच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करु, असे हमीपत्र दिले होते.

''ज्या सदस्यांनी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्रे दिलीच नाहीत, अशांवर जिल्हास्तरावरून कार्यवाहीचे संकेत आहेत. आदेश मिळताच कारवाई होणार आहे.''

-महेंद्र गिरगे, नायब तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

Ray-Ban Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केले कॅमेरा नसलेले नवे स्मार्ट ग्लासेस; Muse AI एजंटसह 'म्युझ चार्म' डिव्हाइस बाजारात...

SCROLL FOR NEXT