44 Chartered Accountants Passed In ICAI Examination
44 Chartered Accountants Passed In ICAI Examination 
छत्रपती संभाजीनगर

प्रतिक मानधनेने सीए परीक्षेत मिळविला 34 वा रॅंक

प्रकाश बनकर

औरंगाबाद : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाने (आयसीएआय) गुरुवारी (ता.16) चार्टर्ड अकाउंटन्सीचा (सीए) अंतिम व फाउंडेशनचा निकाल जाहीर केला. यामध्ये 480 विद्यार्थ्यांपैकी औरंगाबादेतून 44 विद्यार्थ्यांनी सनदी लेखाकार म्हणून पात्रता मिळविली. या परीक्षेत जुन्या कोर्समधून सीए प्रतिक राजेश मानधने याने या परीक्षेत देशातून 34 वा क्रमांक मिळवला. तर नवीन अभ्यासक्रमातून सीए ऐश्वर्या मनोज बडजाते ही शहरातून प्रथम आली, अशी माहिती सीए शाखेचे अध्यक्ष सीए रोहन अचलिया यांनी दिली. 


परीक्षेत नवीन कोर्ससाठी 104 विद्यार्थी सीए फायनलच्या दोन्ही गटासाठी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही गटामध्ये 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम गटात 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, द्वितीय गटात 81 विद्यार्थ्यांपैकी पहिला गटात 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 53 विद्यार्थ्यांपैकी द्वितीय गटामध्ये 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

द्वितीय गटामध्ये 20विद्यार्थी उत्तीर्ण
जुन्या कोर्समधून औरंगाबादेतून सीए फायनल दोन्ही गटाच्या परीक्षेसाठी 42 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 2 विद्यार्थांचे दोन्ही गट उत्तीर्ण झाले. 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम गटात 3 विद्यार्थी, तर द्वितीय गटात 85 विद्यार्थ्यांपैकी पहिला गटामध्ये 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 115 विद्यार्थ्यांपैकी द्वितीय गटामध्ये 20विद्यार्थी उत्तीर्ण झाले, असे शाखेचे अध्यक्ष सीए रोहन अचलिया यांनी सांगितले. 
हेही वाचा -राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला

नवे चार्टर्ड अकाऊंटटस 
श्‍यामलाल काबरा, गौरव भट्टड, वत्सल व्ही. अग्रवाल, नरपत प्रकाशचंद परिहार, मेधावी संतोष शहा, शुभम जैन, अथर्वा आनंद पडळकर, श्रद्धा दिलीप बागला, पल्लवी सोनवणी, उश्निक रवींद्र नागापूरकर, अंकिता अशोक झंवर, अक्षय अरुण बगडिया, अक्षय कैलाश पाटणी, सचिन बाबासाहेब कडू, प्रणिता अनिल भंडारी, नीलम पाथ्रीकर, ऐश्वर्या मनोज बडजाते, बर्लिन कौर मखीजा, उत्कर्षा सांडू जाधव, मिताली विजयकुमारजी भक्कड, निधी लक्ष्मीनारायण सारडा, अक्षय राम देशमुख, श्रेया हुकुमचंद सकलेचा, श्रद्धा प्रदीप गोटूरकर, गौरी रणछोडदास चिचानी, निखील नंदकिशोरजी दाद, पारस सुनील जैन, नेहा गोविंदप्रसाद शर्मा, रोशनी सुशील भारुका, वैभव प्रशांत बिनायके, सौरभ एस अग्रवाल, श्रेयस अक्षय जैन, हृतिक राघवेंद्र होळकर, मयुरी सतीश नावंदर, शुभम लड्डा, संजय रामनिवास लखोटिया, पायल बालप्रसाद झवर, मानसी विनोद पहाडे, आशिष हरिश्‍चंद्रजी तातेड, वृषाली कोट्टूर, प्रतीक राजेश मानधने, स्नेहल गांधी (पोकर्णा), झैनब टकसाळी आणि अंकित शहा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT