ajanta  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : अजिंठा येथे आग लागून लाखोंचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सहा लाख रुपयाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी (ता.१८) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

अजिंठा : येथील एका फोटो स्टूडीओसह मोबाईल दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सहा लाख रुपयाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी (ता.१८) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजिंठा बसस्थानक ते गांधीचौक रस्त्यावर शेख जाफर यांचे मोबाईल दुकान आहे. तसेच लगतच शुभम पोपळघट यांचा फोटो स्टुडिओ असून बुधवारी (ता.१७) गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागून या दोन्ही दुकानातील मोबाईल, साहित्य, संगणक आदी सुमारे लाखो रुपयाचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले.

ग्रामस्थांच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणण्यात आली. पोपळघट यांनी तीन लाखाचे कर्ज काढून स्टुडिओसाठी लागणारे साहित्य खरेदी केले होते. तर मोबाईल दुकानालाही मालकाने मोठा खर्च केला होता. याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शरद वाघुले व सहकारी करीत आहे. नुकसानग्रस्त झालेल्या दोन्ही दुकानदारांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT