Pik-Vima-Yojana Dheeraj Kumar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : पीकविम्याची दमडीही मिळेना ; साेयगाव : नुकसानीचे सर्वेक्षण होऊन महिना उलटला

कोरड्या दुष्काळाच्या वनव्यात सोयगाव तालुका यंदाच्या खरिपाची हंगामात होरपळून निघाला आहे. त्यामुळे तालुक्यात कपाशीसह जवळपास सर्व शेतपिकांचे खूप नुकसान झाले. यासाठी जवळपास शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा असल्यामुळे पिकांचा विमा पण उतरून घेतला होता.

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : कोरड्या दुष्काळाच्या वनव्यात सोयगाव तालुका यंदाच्या खरिपाची हंगामात होरपळून निघाला आहे. त्यामुळे तालुक्यात कपाशीसह जवळपास सर्व शेतपिकांचे खूप नुकसान झाले. यासाठी जवळपास शेतकऱ्यांनी एक रुपयात विमा असल्यामुळे पिकांचा विमा पण उतरून घेतला होता. मात्र, प्रत्यक्षात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पीक विम्याची अग्रिम तर सोडाच कोणतीच नुकसान भरपाई अनेक मंडळातील शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पोचली नाही. एकप्रकारे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार विमा कंपन्यांकडून होत आहे.

यंदाच्या खरिपाच्या हंगामात सोयगाव तालुक्यात भीषण दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती वीस टक्केही उत्पन्न मिळाले नाही. ऐन सोयाबीन काढणीच्या व कापूस वेचणीच्या काळात तालुक्यात दुष्काळाच्या झळा गंभीर झाल्या होत्या. त्यामुळे थोडाफार हातीतोंडी आलेला घासही या दुष्काळाच्या झळांमध्ये मातीमोल झाला आहे. दरम्यान, सोयगाव तालुक्यात खरिपाच्या पिकांचे २६ हजार ५४७ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. त्यापैकी नुकसानीच्या ७२ तासांचा आत शासनाच्या पोर्टलवर तक्रार केलेल्या २३ हजार २०९ शेतकऱ्यांची पडताळणी झाली आहे. परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही.

खरिपाच्या हंगामात तालुक्यात पावसाचा १९ ते २० दिवस आणि १८ ते २० दिवस असा दोन टप्प्यात पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला होता. जून महिन्यात शेतकऱ्यांनी शासनाने केलेल्या एक रुपयात विमा काढण्याचा गाजावाजामुळे मोठ्या प्रमाणात यात सहभागी होऊन प्रतिसाद दिला. मात्र, विमा काढून नुकसान होऊन, कंपन्यांकडून नुकसानग्रस्त पिकांचे सर्वे होऊनही दमडीही सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही.

यंदा खरीप हंगामात सर्व शेतपिकाचा विमा ऑनलाइन काढला. नुकसान झाल्याने मी त्याबाबत ऑनलाइन तक्रारही केली होती. नंतर संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी शेतात येऊन तक्रारीची दखल घेत नुकसानीची नोंद केली असून, त्याला महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी दमडीही विमा कंपनीने अजून मला दिली नाही.

— ज्ञानेश्वर युवरे, शेतकरी, घोसला.

महसूल, कृषी विभाग ऐकून घेईना

शेतकरी विम्याबाबत विचारणा करण्यासाठी महसूल व कृषी विभागाकडे गेले असता संबंधित विभाग त्यांना विमा कंपनीकडे जाण्याच्या अंगुली निर्देश करीत आहे. मात्र, खरीप हंगामाच्या तोंडावर हेच विभाग शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा यासाठी प्रचार रथ व इतर माध्यमातून सतत जनजागृती करतात. मात्र, प्रत्यक्षात कुणीही दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT