accident accident
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद - सोलापूर महामार्गावर ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार ठार

औरंगाबादहुन पाचेगावकडे जात असताना महामार्गावरील थापटीतांडा शिवारातील गुगळादेवी मंदिर जवळ एका वाहनाला ओव्हरटेक करीत होते

मुनाफ शेख

आडुळ (औरंगाबाद): ओव्हरटेक करीत असताना समोर असलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी (ता.९) औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Aurangabad-solapur nh) थापटीतांडा (ता.पैठण) शिवारात घडली. याबाबत पाचोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर दिना राठोड वय ३६ वर्षे, राहणार पाचेगाव (ता.गेवराई जिल्हा बिड) हे दुचाकी क्रमांक एमएच २३ बीए ७४०७ ने औरंगाबादहुन पाचेगावकडे जात असताना महामार्गावरील थापटीतांडा शिवारातील गुगळादेवी मंदिर जवळ एका वाहनाला ओव्हरटेक करीत होते. त्यांच्या समोर चालत असलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकली. यात ते गंभीर जखमी झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची १०३३ या रुग्णवाहिकेचे डॉ. महेश जाधव, आत्माराम गाढेकर, रवी गाढे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवुन जखमीला पुढिल उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. मात्र रस्त्यातच परमेश्वर राठोड यांचा मृत्यू झाला. पाचोड पोलीस ठाण्याचे गोरक्षनाथ कनसे, यांनी घटना स्थळी धाव घेवुन पंचनामा केला. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आली. पुढील तपास ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली गोरक्षनाथ कनसे करीत आहे.

परमेश्वर राठोड यांचे साडु आजारी असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्यांचा जेवणाचा डबा देऊन परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून घरातील कर्ता पुरुषच गेल्याने राठोड कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT