Vaijpur Accident News sakal
छत्रपती संभाजीनगर

Accident News : भरधाव बसची दुचाकीला धडक! दुचाकीस्वाराला ३० फुटांपर्यंत फरफटत नेलं अन् होत्याचं नव्हतं झालं...

सकाळ डिजिटल टीम

Accident News : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (एसटीने) दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी (ता.८) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील बसस्थानकावर घडली.

दरम्यान यावेळी बसचा वेग इतका जास्त होता कि, बस सोबत दुचाकी 30 फुटांपर्यंत फरपटत गेली. या घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी चालकासह वाहकाची जोरदार धुलाई केली.

अधिक माहिती अशी कि, मुक्तार रज्जाक शेख (44 रा. खंडाळा) असे या घटनेतील मृताचे नाव आहे. नाशिक - छत्रपती संभाजीनगर बस ही संभाजीनगरकडे भरधाव वेगात जात असताना तालुक्यातील खंडाळा येथील सर्कलमधून मुक्तार शेख यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यावेळी बसने दुचाकीस्वाराला तब्बल 30 फुटांपर्यंत फरपटत नेले. मुक्तार यांच्या डोक्यासह पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना उपचा्रासाठी वैजापूर येथे दवाखान्यात हलविण्यात आले. यावेळी रस्त्यातच त्यांचा जीव गेला.

दरम्यान घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी चालकासह वाहकास मारहाण केली. वैजापूर पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर वातावरण निवळले.पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya: रामनवमीला रामललाचा 'सूर्याभिषेक'! दुपारी १२ वाजता सूर्यकिरणे कपाळावर चमकणार; शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अद्भूत सोहळा!

Mahavitaran: महावितरणच्या वीज सेवांचा डिजिटल धमाका! बिल पाहणे, भरने आणि तक्रार नोंदवणे आता व्हॉट्सॲपवर शक्य

Jalna News: रुग्णवाहिकांच्या इंधनाचा उद्‍भवणार प्रश्न; पेट्रोल पंपधारकांना क्रेडिटवर डिझेल पेट्रोल बंद झाल्याने उधारी बंद होणार

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

Ashish Shelar: ‘मराठी’साठी चित्रनाट्यगृह उभारणार, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची घोषणा

SCROLL FOR NEXT