Aurangabad Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर कारच्या धडकेत बापलेक गंभीर जखमी

सुटी झालेल्या रुग्णावर अपघातानंतर पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्याची वेळ

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतणाऱ्या आजारी रुग्णाच्या दुचाकीस (एमएच २० एफबी ६९६०) समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने वडील व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद - सोलापुर (Solapur) राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. ही मुरमा (ता.पैठण) फाट्याजवळ सोमवारी (ता.२१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. पुन्हा सुटी झालेल्या रुग्णावर अपघातानंतर उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्याची नामुष्की ओढवली. या संबंधीअधिक माहीती अशी, विहामांडवा (ता.पैठण) येथील संजय मुरलीधर ब्रह्मराक्षस (वय ५०) हे त्यांचा मुलगा राहुल ब्रह्मराक्षस (वय १२) हा आजारी असल्याने ते त्यास घेऊन औरंगाबाद (Aurangabad) येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. (Accident Took Place On Solapur Aurangabad Highway, Father And Son Serious Injured)

ते रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर दुचाकीने सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावाकडे निघाले. ते आपल्या गावी विहामांडवा येथे जाण्यासाठी धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाट्याजवळ वळण घेत असताना बीडकडुन भरधाव वेगात औरंगाबादकडे जाणाऱ्या कारने जोराची धडक दिली. यात संजय मुरलीधर ब्रह्मराक्षस (वय ५०) व त्यांचा मुलगा राहुल ब्रह्मराक्षस (वय १२ ) हे पितापुत्र हे गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की कारसह दुचाकीच्या समोरील भागाचा पुर्णतः चुराडा झाला. या अपघाताची माहिती पाचोड पोलिसांना देण्यात आली. दोन्ही जखमींना नागरिकांनी तातडीने पाचोडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. चौरे यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय घाटी रूग्णालयात पाठविले. यात मुलगा राहुल याचा पाय फ्रॅक्चर झाला असून रुग्णालयातून सुटी घेऊन घरी परतत असतानाच अपघात होऊन त्यांना पुन्हा उपचारासाठी भरती व्हावे लागले.

यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात होताच कारचालक घटनास्थळाहून पसार झाला. या अपघाताची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश शिंदे, फेरोज बर्डे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

SCROLL FOR NEXT