Accident with Sanjay Shirsat and Shahajibapu Patil Accident with Sanjay Shirsat and Shahajibapu Patil
छत्रपती संभाजीनगर

संजय शिरसाट व शहाजीबापू पाटलांसोबत अपघात; काय घडले वाचा...

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : बंड करून मुंबईत परतलेले आमदार आपापल्या मतदार संघात परतले आहेत. त्यांच्याकडून शक्तिप्रदर्शनही करण्यात येत आहे. या शक्तिप्रदर्शनातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शक्तिप्रदर्शन करीत असताना औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची गाडी रॅलीत धडकली. आजच आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हेही थोडक्यात वाचले. आकाशवाणी या त्यांच्या आमदार निवासातील खोलीच्या छताचा मोठा भाग कोसळला.

एकनाथ शिंदे यांच्यासह हे आमदार आधी गुजरातमधील सुरतला गेले होते. नंतर आसामधील गुवाहाटी येथे तळ ठोकला. तब्बल अकरा दिवसांनी त्यांचे मुंबईत आगमन झाले. येथे काही दिवस राहिल्यानंतर हे आमदार आपापल्या मतदार संघात जाण्यासाठी निघाले. तब्बल २० दिवसांनी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे शहरात आगमन झाले.

यावेळी शिरसाट यांनी विमानतळापासून ते संपर्क कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीत शंभरहून अधिक चारचाकी गाड्यांचा सहभाग होता. मर्सिडीजमध्ये उभे राहून संजय शिरसाट हे समर्थकांना अभिवादन करीत होते. त्यांचा ताफा सेव्हनहील उड्डाणपुलावर जात होता. यावेळी समोरच्या गाडीने ब्रेक मारल्याने शिरसाटांची गाडी समोरच्या गाडीला (Road Accident) धडकली. तर मागची गाडी त्यांच्या गाडीला धडकली.

शिरसाट यांना राग अनावर

संजय शिरसाट यांच्‍या गाडीचा अपघात झाल्याने राग अनावर झाला. भर रॅलीत त्यांनी समोरच्या आणि मागच्या अशा दोन्ही बाजूंनी धडक देणाऱ्या कार चालकांना फैलावर घेतले. राग व्यक्त केल्यानंतर त्यांचा ताफा निघाला.

शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले

शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या आकाशवाणी या आमदार निवासातील छताचा भलामोठा भाग आजच कोसळला. यावेळी शहाजीबापू पाटील हे आमदार निवासातील दुसऱ्या रूममध्ये होते. यामुळे ते थोडक्यात बचावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT