sambhaji nagar  esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : आरोपीच्या कुटुंबाचा पोलिसांवर हल्ला ; सराईत गुन्हेगार स्थानबद्ध, वृद्धांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने होता लुटत

सराईत गुन्हेगार स्थानबद्ध, वृद्धांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने होता लुटत

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : वृद्ध महिलांना दुचाकीवर लिफ्ट देण्याचा बहाणा करून लुटणारा सराईत गुन्हेगार राहुल कडुबा पवार (वय ३०, रा. बाबरा, ता. फुलंब्री, हल्ली मुक्काम कुंभेफळ) याला पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी एमपीडीए ॲक्टखाली हर्सूल कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पाच जणांवर वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

राहुल हा वयोवृद्ध महिलांना गोड बोलून विश्वासात घेत त्यांना दुचाकीवर लिफ्ट देण्याचा बहाणा करायचा. नंतर त्यांना निर्जनस्थळी नेऊन ठार मारण्याची धमकी देत दागिने, रोख रक्कम हिसकावून त्यांना तिथेच सोडून पसार होत होता. याशिवाय तो वाटमारीही करीत होता. त्याच्या विरुद्ध वेळोवेळी कारवाईसुद्धा करण्यात आली होती.

परंतु, त्याच्या सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. पोलिस त्याचा ठावठिकाणाचा शोध घेत होते. परंतु, तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो बाबरा शिवारात असल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांना मिळाली. पोलिस त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला.

अखेर पोलिसांनी त्याला पकडले. ही कारवाई सतीश वाघ, पोलिस निरीक्षक, प्रताप नवघिरे, सुनील इंगळे, विजय जाधव, दादासाहेब बनसोडे, लहू थोटे, श्रीमंत भालेराव, विजय धुमाळ, जनाबाई चव्हाण, संतोष डमाळे, शंकर चव्हाण, निवृत्ती मदणे, शैलेश गोरे, सिद्धांत वक्ते, दादाराव पवार, जयसिंग नागलोद, सुनील गोरे, शकुल बनकर, संतोष टिमकीकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Professor Recruitment : प्राध्यापक भरतीसाठी ‘६०+२०+२०’चा नियम

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या विरुद्ध अटक वॅारंट जारी

प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली Good News!सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...'आमच्या आयुष्यातील सगळ्यात...'

Rajgurunagar Crime : इन्स्टाग्रामवर ओळख; प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Shambhuraj Desai : आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला? आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण? शंभूराज देसाईंचा कोणाला उद्देशून इशारा

SCROLL FOR NEXT