ambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : कॅफेत अश्लिलतेला थारा

कॅफेचालकासहित या जोडप्यावर कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यंतरी नूतन कॉलनी भागातील कॅफेवर छापा मारला. यावेळी डार्कनेस असलेल्या या कॅफेमध्ये अल्पवईन मुले अश्लील चाळे करताना आढळून आली. यानंतर वाळूज महानगर भागातील महाराणा प्रताप चौकात देखील पोलिसांनी छापे मारत कारवाई केली. यावेळी देखील तीन जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले. कॅफेचालकासहित या जोडप्यावर कारवाई करण्यात आली. विषय हा कॅफे, कॉफी सेंटरचा नाही, किंवा सर्वच ठिकाणी असले थिल्लर प्रकार चालतात अशातला देखील भाग नाही.

मात्र, तारत्म्य सोडलेल्या तरुणाईला सार्वजनिक ठिकाणी प्रायव्हसी हवी असते. ती सर्वच ठिकाणी भेटेल असे शहरात शक्य नाही. नेमकी हीच बाब अनेक कॅफे सेंटर चालकांनी हेरली. त्यानंतर जोडप्यांना भेटण्यासाठी कॅफेत ब्लॅक फिल्म, पार्टीशन असणाऱ्या केबीन निर्माण झाल्या. मार्केटला २० रुपयात मिळणारी कॉफी या कॅफेत दीडशे रुपयांना मिळत आहे. अगदी एक-दोन तासांसाठी जोडप्यांना केबीन उपलब्ध होत आहे. कोणतीही रोकटोक नसलेल्या अशा कॅफेमध्ये सहज प्रवेश भेटत असल्याने आंबटशौकीन जोडपीदेखील क्लास, कॉलेज बंक करून याचा फायदा घेताता. कॅफेचा हा विषय कारवाईमुळे प्रकर्षाने समोर आला.

मात्र शहरातील लॉजमध्ये सहजासहजी मिळणाऱ्या रूमचे काय, हा देखील प्रश्न आहे. लॉजमध्ये रूम हवी असल्यास पूर्वी कडक नियमावली होती. अनेक लॉजमध्ये प्रेमीयुगलांनी आत्महत्या केल्याचे देखील प्रकार शहरात घडले आहेत. रूम देताना जोडपे सज्ञान असल्यास त्यांचे आधारकार्ड किंवा ओळखपत्र घेऊन रजिस्टरला तशी नोंद करावी लागते. शहरातील अनेक लॉज चालक/मालक मात्र हा नियम गुंडाळून एका तासाच्या बोलीवर सहज हजार ते दीड हजार रुपये आकारून रूम उपलब्ध करून देतात.

लॉज चेकिंग हा पोलिसांच्या बंदोबस्ताचा एक भाग आहे. मात्र, ब्रॉड माईंडच्या नावाखाली उच्छाद मांडलेल्या या मंडळींनादेखील पोलिसांनीच आवरावे का, हादेखील प्रश्न आहे. प्रत्येक जबाबदारी पोलीस विभागावर ढकलून चालणार नाही. पोलिसांना देखील कायदा सुव्यवस्था, व्हीआयपी बंदोबस्त, तपास कामे या सोबतच इतर देखील अनेक महत्वाची कामे आहेत. तक्रार आल्यानंतर किंवा माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कॅफे सेंटरवर केलेली कारवाई ही योग्यच आहे. मात्र, या आस्थापनाना परवानगी देणाऱ्या इतर यंत्रणानी देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

त्याशिवाय घरातून मिळणारा पॉकेटमनी नेमका मुले कुठे खर्च करतात, आपल्या मुलीच्या बॅगमध्ये महागडी चॉकलेट, गिफ्ट कुठून येत असतील हे देखील सुज्ञ पालकांनी तपासले पाहिजे. काही महिन्यांपूर्वी गुलमंडीसारख्या भागात चप्पल सेंटर मध्ये काम करणाऱ्या दोन तरुणांनी १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवत तिला ब्लॅकमेल केले होते. प्रायव्हसी देणारे हे कॅफे सेंटर अशा ब्लॅकमेल करणाऱ्या प्रवृत्तींना पोषक ठरणारे वातावरण उपलब्ध करून देत आहे. शहरात काही वर्षांपूर्वी हुक्का पार्लर संस्कृती वाढली होती. कॉलेजवयीनच नव्हे, तर प्रौढांचे देखील आकर्षण ठरत होते. मात्र, पोलिसांनी या हुक्का पार्लरवर कारवाई केल्यामुळे हा प्रकार बंद झाला होता. समाज म्हणून आपण पोलिसांकडून ज्या प्रमाणात अपेक्षा ठेवतो तितकेच सामाजिक योगदान आपण जागरूक नागरिक म्हणून त्यांना देतो का, याचेदेखील प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT