Most Unique Marabou Stork Sakal
छत्रपती संभाजीनगर

Marabou Stork : वन विभागाने घडवली ‘लव्ह बर्ड’ची भेट; आफ्रिकन ‘माराबू स्टॉर्क’ला असा मिळाला जोडीदार

Marabou Stork Love Bird : रामपूर येथील शेतकरी अंकुश मोरे यांना मोमबत्ता तलाव परिसरात एक दुर्मिळ मोठा पक्षी बसलेला दिसून आला.

सकाळ वृत्तसेवा

दौलताबाद : ऑफ्रिकेतून प्रवास करीत आलेला एक माराबू स्टॉर्क पक्षी आजारी अवस्थेत रविवारी (ता. ३०) सायंकाळी येथील मोमबत्ता तलाव परिसरात आढळला. हा पक्षी कधीच एकटा प्रवास करीत नाही.

त्यामुळे सोबत त्याची जोडीदार असावी, हे हेरून वनविभागाने सोमवारी (ता. एक) परिसर पिंजून काढला. सायंकाळी याच परिसरात काही अंतरावर मादीही आढळून आली असून, ताटातूट झालेल्या या ‘लव्ह बर्ड’ची भेट घडवून आणली.

रामपूर येथील शेतकरी अंकुश मोरे यांना मोमबत्ता तलाव परिसरात एक दुर्मिळ मोठा पक्षी बसलेला दिसून आला. त्याला उडता येत नसल्याने तो निपचित बसलेला होता. या पक्ष्यावर कुत्र्यांनी हल्ला करू नये, म्हणून त्यांनी वन विभागाला माहिती दिली.

वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. पेहरकर यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक राम मुळे यांनी या पक्ष्याची माहिती घेतली. हा पक्षी एकटा प्रवास करीत नाही तर नर व मादी कायम सोबत असतात; त्यामुळे मुळे यांनी सोमवारी सकाळपासून मोमबत्ता तलाव परिसरात सर्च ऑपरेशन राबविले.

यात सायंकाळी मादी माराबू स्टॉर्क पक्षीसुद्धा मिळून आला. या दोघांना वन विभागाच्या रोपवाटिकेत ठेवण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी स्मिता इंगळे यांना आजारी पक्ष्यावर उपचार केले.

वजन तब्बल नऊ किलो

माराबू स्टॉर्क पक्षी एकटा प्रवास न करता मादीसोबत प्रवास करतो. गरुडाप्रमाणे उंचावरून भक्ष्य शोधून शिकार करतात, त्यांचा मुख्य आहार मासे, बेडूक, अंडी, कीटक, छोटे पक्षी आदी आहे.

हे पक्षी पर्यावरणपूरक असून, मानवाने टाकलेले खाद्य खातात, वर्षाला चार ते पाच अंडी हा पक्षी घालतो. याचे वजन नऊ किलो, पंखाची उंची तीन ते साडेतीन मीटर आहे. वयोमान २५ ते ३० वर्षे असते. मागील काही वर्षांपासून या पक्ष्यांची संख्या घटत आहे.

व्हायरल इन्फेक्शन असल्याने हा पक्षी अशक्त झाला होता. परंतु, आता त्याची प्रकृती चांगली असून, अभयारण्यात सोडण्यास कुठलीही हरकत नाही.

— स्मिता इंगळे, पशुवैद्यकीय अधिकारी, दौलताबाद

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायानुसार हा पक्षी संपूर्णतः बरा झाला असल्याने वरिष्ठांच्या आदेशाने या पक्ष्यांना अभयारण्यात सोडण्यात येईल.

— राम मुळे, वनरक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray Statue Vandalised : मीनाताईंच्या पुतळ्यावर रंगफेक; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबईत तणाव वाढला

Pune News : अंगणवाड्यांची धोकादायक स्थिती; बालशिक्षण धोक्यात; दाटीवाटीत मुलांचे शिक्षण, सुरक्षिततेचा प्रश्न

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Robbery At SBI Bank : स्टेट बँकेच्या शाखेवर पिस्तूल, चाकूने धमकावून दरोडा, आठ कोटींचा ऐवज लुटला, पोलीस घटनास्थळी दाखल

Navratri 2025 Do's and Don'ts: शारदीय नवरात्रात काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT