Mahavikas Aghadi's Satish Chavan 
छत्रपती संभाजीनगर

विजयाच्या हॅट्ट्रीकनंतर सतीश चव्हाणांनी मानले मतदारांचे आभार; म्हणाले सर्वांची साथ प्रत्येक पावलावर होती

गणेश पिटेकर

औरंगाबाद : मराठवाडा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रीक साजरी केली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला आहे. विजयानंतर चव्हाण यांनी पदवीधर मतदारांचे आभार मानले आहेत. निवडणुकीत चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली आहेत, तर बोराळकरांना ५८ हजार ७४३ मते घेतली आहेत.

फेसबुकवरील पोस्टमध्ये चव्हाण लिहितात, की अंतःकरण पूर्वक आभार! आपली सर्वांची साथ प्रत्येक पावलावर होती. हा विजय तुमच्या निर्व्याज प्रेमाचा आहे. मार्गदर्शनासह अथक परिश्रम घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या मान्यवर नेत्यांनी, प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून लढलेल्या कार्यकर्त्यांनी आणि सत्याचाच त्रिवार विजय होतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करणाऱ्या मराठवाड्यातील माझ्या तमाम सुज्ञ पदवीधर बंधू आणि भगिनींनी ही विजयश्री खेचून आणली आहे. प्रसिद्धी माध्यमे आणि समाजमाध्यमांचीही विशेष साथ मिळाली. आपणांस एकूण १,१६,६३८ मते मिळाली असून ५७,८९५ मतांच्या फरकाने महाविकास आघाडीचा महाविजय झाला आहे. आपल्या सर्वांचे आभार !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘पुजारीपण करणं हा पुजाऱ्यांचा धंदा’; छगन भुजबळांचं विधान चर्चेत; नेमकं काय म्हणाले?

EPFO New Rules: PF संदर्भात 6 महत्त्वाचे निर्णय; तुमच्यावर काय परिणाम होणार?

NEET Paper Leak: महाराष्ट्रातील चहाविक्रेत्यासह 14 जणांवर NEET पेपरफुटी प्रकरणात आरोप निश्चित

११ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, खासगी शिकवणीनंतर मुलाला एकटे थांबवून...; घटनेनं नवी मुंबईत खळबळ

Police Army Recruitment : पोलीस, सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्जांना मुदतवाढ; उमेदवारांना २४ नोव्हेंबरपर्यंत संधी

SCROLL FOR NEXT