link Aadhaar Card To Bank Account 
छत्रपती संभाजीनगर

कर्जमुक्‍तीसाठी 40 हजारांवर शेतकऱ्यांनी केली आधार जोडणी

प्रकाश बनकर

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेसाठीची प्रक्रिया बॅंकांतर्फे सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून बॅंकांतर्फे कर्जदार शेतकऱ्यांना आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा बॅंक, ग्रामीण बॅंक आणि व्यापारी बॅंकांतर्फे ग्राहकांना या सूचना दिल्या जात आहेत. यातून जिल्हा बॅंकेच्या 40 हजार 461 सभासदांनी आपले खाते आधार कार्डला लिंक केल्याची माहिती सोमवारी (ता.20) जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

 हेही वाचा - अॅकॅडमिक ऑडिट नसल्यास महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द
जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून 1 लाख 20 हजार सभासदांना 950 कोटींचे कृषिकर्ज वाटप करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले व 30 सप्टेंबर 2019 रोजी थकीत असलेले अल्पमुदत पीककर्ज आणि अल्पमुदत पीक पुनर्गठित कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात राष्ट्रीयीकृत बॅंका, व्यापारी बॅंका, जिल्हा बॅंका, ग्रामीण बॅंकांसह विविध कार्यकारी सोसायट्या यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ होणार आहे. 

15 हजार शेतकऱ्यांनी अद्याप आधार कार्ड जोडले नाही

यासाठी बॅंकांतर्फे शेतकऱ्यांना आधार कार्ड जोडण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. जिल्हा ग्रामीण बॅंकेतर्फे जिल्ह्यातील 1 लाख 11 हजार 920 शेतकरी सभासदांपैकी 55 हजार 687 शेतकऱ्यांनी आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडले होते. तर 56 हजार 233 शेतकऱ्यांचे आधार कार्ड जोडणे (लिंकिंग) बाकी होते. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केलेले आवाहन आणि बॅंकांनी केलेल्या आवाहनानुसार 40 हजार 461 शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड खात्यांशी जोडले. तर उर्वरित 15 हजार 772 शेतकऱ्यांनी अद्यापही ही प्रक्रिया केलेली नाही. त्यांनी तत्काळ आपले आधार कार्ड बॅंकेशी लिंक करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे करण्यात येत आहे. 

बॅंक शेतकरी संख्या आधार जोडलेले आधार न जोडलेले 
जिल्हा बॅंक 1 लाख 11 हजार 920 96 हजार 148 शेतकरी 15 हजार 772

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

Khed Tehsil Heavy Rain : सतारकावस्तीकडे जाणारा पूल खचल्याने ५०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट

Gas Cylinder : खारपाडा येथे नदीत व खाडीत सिलिंडरचा पूर; हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून, चक्क बोटीने सिलेंडर काढले बाहेर

Pune Investment Scam: बांधकामात गुंतवणुकीचे आमिष; केबल व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक, चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT