तुर sakal
छत्रपती संभाजीनगर

Agriculture : तुरीच्या BDN-711 वाणाला यंदाही पसंती

विद्यापीठाच्या बियाणे विक्रीस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने विद्यापीठाच्या वतीने शिफारस केलेल्या बियाणांचा पुरवठा करण्यात येत असून सोमवार ( ता.२९ ) पासून पैठण रोडवरील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रात शेतकऱ्यांना तूर बीडीएन - ७११ वाणाच्या विक्रीस प्रारंभ झाला आहे.

पैठण रोड वरील विस्तार कृषी विस्तार शिक्षण केंद्रात खरीप बियाणे विक्रीप्रसंगी प्रथम एकत्र आलेले दोन शेतकरी श्रीराम कोरडे आणि रमेश सादरे यांचा सत्कार केंद्राच्या वतीने आणि जिल्हा सरकारी वकील नामदेवराव बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी. बी. पाटील, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी सोनवणे, कृषी तंत्र विद्यालयाचे दत्ता मुळे उपस्थित होते.

विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या बियाणांची माहिती दिली. यात बियाणे पॅक, किंमत, पिकाच्या वाणाची वैशिष्ट्ये आदी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली. सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शंभरपेक्षा अधिक बीडीएन - ७११ या तूर वाणाच्या बॅगांची विक्री झाली. खरेदी करतेवेळी अनेक शेतकऱ्यांनी तूर पिकाचा गत हंगाम हा आम्हाला चांगला गेला. उत्पन्न आणि भावही समाधानकारक मिळाला, असे सांगितले.

माफक दरात बियाणे

यंदाही आम्ही आम्ही या वाणाचे तुरीच्या क्षेत्रात वाढ करणार आहोत, असे आवर्जून सांगितले. विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबादचे प्रभारी रामेश्वर ठोंबरे यांनी आभार व्यक्त करून यंदा मोठ्या प्रमाणावर बीडीएन - ७११ तूर बियाणे माफक दरात उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT