abdul sattar agriculture minister esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : दसरा मेळाव्याला सिल्लोडमधून जाणार २५ हजार शिवसैनिक

कृषिमंत्री सत्तार यांची माहिती : ३५० एसटी बसेसचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : दसरा मेळाव्यासाठी मुंबई येथील बिकेसी मैदानावर तालुक्यातून २५ हजाराहून अधिक शिवसैनिक जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. बुधवारी येथील शिवसेना भवन कार्यालयाच्या परिसरात आयोजित तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मेळाव्यासाठी ३५० बसेसचे नियोजन झाले असून, मतदारसंघातून ५०० एसटी बसेसची मागणी होत असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले असून, बिकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याची सभा ना भूतो ना भविष्य सभा होईल. मेळाव्यास जाण्यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २० तास लोकांची कामे करतात त्यामुळे विरोधकांची झोप उडाली असल्याचे श्री.सत्तार म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृषिमंत्री सत्तार यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, केशवराव तायडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, अजीज बागवान, नंदकिशोर सहारे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

PCMC News : डिजिटल पेमेंट सुविधेअभावी नागरिक त्रस्त, महापालिका रुग्णालयांत रोख रक्कम बाळगणे भाग; उपचारांत विलंब

Ravet Pollution : रावेत, आकुर्डीत धूलिकणांच्या प्रमाणात वाढ; प्राधिकरण, निगडी, किवळे भागांतही त्रास, आरोग्यावर दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT