Ajit Pawar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Ajit Pawar: मराठा समाजाच्या विरोधानंतर अजित पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द, खरं कारण काय?

Sandip Kapde

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संभाजीनगर दौरा रद्द करण्यात आला आहे. मराठा समाजाने अजित पवार यांच्या संभाजीनगर दौऱ्याला विरोध केला होता. पोलिसांनी अनेक मराठा कार्यकर्त्यांना देखील अटक देखील केली होती.

अजित पवार हे आज दिवसभर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र अजित पवार यांनी वेळेवर दौरा रद्द केला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या संमेलनाला अजित पवारांनी येऊ नये म्हणून सकल मराठा समाजाने आवाहन केले होते. त्यामुळे या समलेनाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ होण्याची चिन्हे होती. अजित पवार हे सकाळी 10 वाजता हेलिकॉप्टरने दाखल होणार होते. संभाजीनगर जिल्ह्याची आढावा बैठक देखील अजित पवार घेणार होते. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगत अजित पवार यांनी दौरा रद्द केला आहे.

अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध करण्याचं पत्र त्यांनी दिलं होतं. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गंगापुरात न येण्याचे मराठा समाजाने केले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT