Ambadas Danve And Imtiaz Jaleel  esakal
छत्रपती संभाजीनगर

"जलील राष्ट्रपती किंवा पंतप्रधान नाहीत, त्यांच्या मोर्चाला आम्ही महत्त्व देत नाही"

जलील यांच्या मोर्चावर आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

दत्ता लवांडे

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या विरोधात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज मूक मोर्चा काढला आहे. त्यानंतर आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या मोर्चाला विरोध दर्शवत जनतेने या मोर्चाकडे लक्ष देण्याची गरज नाही, मुस्लीम मत राष्ट्रवादीकडे जाऊ नयेत म्हणून त्यांनी हा मोर्चा काढला असल्याचं सांगितलं आहे.

(Ambadas Danve On MP Imtiyaj Jaleel)

दरम्यान, जलील यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची बैठक घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी मूक मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्यांच्या या मोर्चामुळे औरंगाबादमधील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. पण ते काही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाहीत त्यामुळे आम्ही त्यांच्या मोर्चाला जास्त महत्त्व देत नाहीत असं शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबदचा दौरा केला होता त्यामध्ये, नामांतराच्या निर्णयात सुसंवाद नव्हता असं सांगत आपले हात वर केले होते. शरद पवारांच्या या भूमीकेने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर जलील यांनी मोर्चा काढला आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल दहा निर्णय घेतले होते त्यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहराच्या नामांतराचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानंतर तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला होता. महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या बैठकीत हा निर्णय घेतल्यामुळे जलील यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी आज औरंगाबाद शहरात मोर्चा काढला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

औरंगाबादच्या नामांतराला जलील हे कधीच पाठिंबा देऊ शकत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने मतासाठी हा सगळा खटाटोप असल्याचं दानवे यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या या मोर्चाला आम्ही जास्त महत्त्व देत नाहीत असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Winds Strengthen : मॉन्सूनच्या वाऱ्याचा वेग वाढला! महाराष्ट्रात दक्षिण कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर चार दिवस मुसळधार

मुलीच्या वादाचं प्रकरण, २२ वर्षीय कॉलेज तरुणाकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; APIसह हवालदाराला अटक

Latest Marathi News Update: नागपूरमध्ये ३५३ व्या शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यानिमित्त साहसी खेळांचं सादरीकरण

Gold Rate Today: RBIच्या निर्णयानंतर आज मोठी घसरण! 8 दिवसांत सोन्याचे भाव कोसळले; चांदीही स्वस्त, महाराष्ट्रात आजचा भाव किती?

भारताच्या आर. प्रज्ञानंदने Norway Chess चे विजेतेपद जिंकून घडवला इतिहास! १४ वर्षांत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT