Amit Shah sakal
छत्रपती संभाजीनगर

Amit Shah : अमित शहा आज फुंकणार प्रचाराचे रणशिंग ; छत्रपती संभाजीनगरात सभा,मराठवाड्यासाठी काय देणार?

भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी (ता. पाच) राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता सांस्कृतिक मैदानावर त्यांची सभा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी (ता. पाच) राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता सांस्कृतिक मैदानावर त्यांची सभा होणार आहे. सोमवारी रात्री १० वाजता त्यांचे शहरात आगमन झाले आहे. अमित शहा यांची जिल्ह्यात ही पहिलीच सभा असून, मराठवाड्यासाठी ते काय घोषणा करणार? याची उत्सुकता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आठवडाभरात लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार भाजपच्या राज्यभर सभा सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जागा शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेनेकडे होती. त्यामुळे शिंदे गटाचा या मतदारसंघासाठी दावा असला तरी भाजपतर्फे देखील तयारी केली जात आहे.

यापूर्वी अमित शहा यांचा दौरा दोनवेळा रद्द झाला होता. त्यानंतर मंगळवारी शहा पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत आहेत. सायंकाळी होणाऱ्या या सभेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे.

आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब यांच्यासह प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय खंबायते गेल्या काही दिवसांपासून सभेची तयारी करत आहेत.

किती होणार गर्दी?

भाजपने राज्यात लोकसभा निवडणुकीचे १२ क्लस्टर तयार केले आहेत. त्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व नगर मतदारसंघाचे एक आहे. या क्लस्टरसाठी छत्रपती संभाजीनगरात सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होत आहे. सांस्कृतिक मंडळाचे मैदान राजकीय सभांच्या दृष्टीने ऐतिहासिक असून, याठिकाणी गर्दी जमविणे अनेकांना अशक्य होते. त्यामुळे या सभेसाठी किती गर्दी होणार याकडेच विरोधकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT