Verul Tirthkund Sakal
छत्रपती संभाजीनगर

National Tourism Day : शहरालगतची पर्यटनस्थळे बकाल अन् दुरवस्थेने मनस्ताप

ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना येथील प्राचीन वास्तू खुणावत असतात.

अनिल जमधडे

- ९९२२०३४५००

ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना येथील प्राचीन वास्तू खुणावत असतात. मात्र, पुरेशा सोयीसुविधा आणि एकाच वाहनातून पर्यटन दर्शन सुरू होण्याची खरी गरज आहे.

देवगिरी किल्ला

ऐतिहासिक त्रिकोणी देवगिरी किल्ला ११८७ च्या आसपास पहिला यादव सम्राट भिल्लमा व्ही. याने बांधला. १३०८ मध्ये उत्तर भारतातील काही भागांवर राज्य करणाऱ्या दिल्ली सल्तनतच्या अलाउद्दीन खलजीने शहर ताब्यात घेतले. चोरबावडी, कडा बावडी, शक्कर बावडी, सरस्वती बावडी यासह शंभरावर वास्तू या परिसरात आहेत. मात्र, त्या दुर्लक्षित होत आहेत. राज्य पुरातत्त्व व भारतीय पुरातत्त्व विभागात सुसंवाद नसल्याने या वास्तूंची दुरवस्था झाली आहे.

मोमबत्ता तलाव

दौलताबाद घाटातील यादवकालीन मोमबत्ता तलाव पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. वेरूळ, म्हैसमाळला जाताना या ठिकाणी थांबल्याशिवाय पाऊल पुढे पडत नाही. दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्यापासून एक ते दीड किलोमीटरवरील तलावानजीकच्या निसर्गाचा आनंद लुटण्याचा मोह प्रत्येकाला होतो.

घृष्णेश्वरचे आकर्षण

वेरुळ हे बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर आहे. येथे दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले हे मंदिर आहे. येथे श्रावणी सोमवारला हजारो भाविकांची गर्दी उसळते. शिवालय तीर्थकुंडात स्नान करून दर्शन घेण्याची परंपरा आहे. मंदिराच्या परिसराला शिवालय अथवा नागस्थान असे म्हणत असत. पद्मपुराणातील सह्याद्री खंडात घृष्णेश्‍वराबद्दल माहिती आलेली आहे.

राष्ट्रकुल घराणे ज्यावेळी प्रबळ होते, म्हणजे इ. स. ७५० च्या सुमारास कृष्णराजराय या राष्ट्रकुटाने हे मंदिर बांधल्याचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध आहे. नंतर याचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांच्या सासूबाई गौतमीबाई यांनी १७३० मध्ये केला. वेरूळ हे शिवाजीराजांचे पणजे व आजे यांचे पाटीलकीचे गाव आहे.

जगभराचे आकर्षण वेरुळ लेणी

वेरूळ लेणी ही शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत. यामध्ये १२ बौद्ध (लेणे क्र. १-१२), १७ हिंदू (लेणे क्र. १३ - २९) आणि ५ जैन (लेणे क्र. ३० - ३४) लेणी आहेत.

इ.स. १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून तर सन १९८३ मध्ये युनेस्कोने वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केलेला आहे. कैलास मंदिर जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत नमुना आहे. या लेण्या पहाण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतात.

कलिमठची कालिका माता

छत्रपती संभाजीनगर येथून साधारण साठ किलोमीटर आणि कन्नड शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावरकालिमठ देवस्थानात कालिका मातेचे मंदिर आहे. कालिमठ देवस्थानची स्थापना दहा एप्रिल १९८८ रोजी स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी केली. मंदिराचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण केले. प्रत्येक बांधकाम नऊच्या पटीत केले. ओटा, कॉलमचे अंतर, प्रदक्षिणेचा मार्ग, गाभारा, सभामंडप व मंदिरावरील कळसांची संख्याही नऊ आहे.

विशेष म्हणजे कन्नड ते कालिमठ अंतरदेखील नऊ किलोमीटर आहे. कालिका मातेच्या दरबारात विविध उत्सव साजरे केले जातात. कालिमठचा परिसर अत्यंत रम्य असून, मंदिरामागे अंबाडी व शिवना नदीचा संगम आहे. मंदिराच्या मागेच स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराजांची समाधी आहे. देशभरातून कालिका मातेच्या दर्शनासाठी भक्तांची सतत वर्दळ असते.

शिल्पांसाठी प्रसिद्ध पितळखोरा लेणी

पितळखोरा लेणीमध्ये भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ आहेत. या स्तंभांवर धवल, कृष्ण, लाल, तपकिरी वा पिंगट रंगांत रंगविलेली बौद्ध भिक्खुंची चित्रे आहेत. भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठित आणि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तींनी चितारलेले, सजविलेले आहे. या लेणीतील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या शिल्पाने शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळेच महत्त्व प्राप्त करून ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT