Corona News Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

हा लातूर पॅटर्न औरंगाबादेत कोरोनाला रोखणार घराबाहेर...

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन वारंवार केले जात असले तरी अनेक जण जीवनावश्‍यक वस्तू, भाजीपाला खरेदीच्या नावाखाली घराबाहेर पडत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून घरात कोरोनाचे विषाणू प्रवेश करत आहेत. त्यामुळे कोरोनाला घराबाहेरच्या बाहेरच रोखण्यासाठी लातूरप्रमाणे शहरात देखील अँटी कोरोना पोलिस संकल्पना राबविली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (ता. १५) सांगितले. प्रत्येक घरातील ज्येष्ठ किंवा लहान मुलांनी घराबाहेर पडणाऱ्या सदस्याला योग्य काळजीचा सल्ला द्यायचा अशी अँटी कोरोना पोलिसची संकल्पना आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शहरात झापाट्याने वाढत आहे. त्यावर माहिती देतना, पांडेय म्हणाले, आत्तापर्यंतच्या रुग्णांची हिस्‍ट्री पाहता कोणी घरात बसून आहे आणि त्याला कोरोनाची लागण झाली असे झाले नाही. संबंधित किंवा त्याच्या घरातील एखादी व्यक्ती बाहेर गेला अशीच हिस्ट्री समोर आली आहे. त्यामुळे कोरोना युद्ध जिंकण्यासाठी आता नागरिकांच्या सहकार्याची आवश्‍यकता आहे. गेल्या काही दिवसांपासून माझा वॉर्ड कोरोनामुक्त वॉर्ड अभियान राबविले जात आहे.

तसेच मोहल्ला कोविड वॉरियर्स ही संकल्पना राबविण्यासाठी तरुणांना आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक मोहल्ल्यात चार ते पाच तरुणांची निवड करून त्यांच्यामार्फत मोहल्ल्यातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीवर नजर ठेवली जाईल. संबंधिताला बाहेर जाणे गरजेचे होते का? त्याचे अत्यावश्‍यक खबरदारी घेतली आहे का? या बाबींवर तरुण नजर ठेवतील. लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी राबविलेल्या अँटी कोरोना पोलिसची संकल्पना चांगलीत फायदेशीर ठरली आहे.

घरातल्या एखाद्या लहान सदस्याने किंवा ज्येष्ठाने काळी घेण्याबाबत सूचना केल्यास प्रत्येक जण त्यांचे ऐकतो. हा मानवी स्वभाव लक्षात घेऊन लातूरमध्ये अँटी कोरोना पोलिसची संकल्पना राबविण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकल्पनेचे कौतुक केले आहे. त्यानुसार औरंगाबाद शहरातही ही संकल्पना राबविली जाणार आहे. घरातील अँटी कोरोना पोलिस घराबाहेर जाणाऱ्याला मास्क वापरणे, स्वच्छ हात धुणे, घरात आल्यानंतर अंघोळ करणे अशा बाबींवर लक्ष ठेऊन सूचना करतील, असे पांडेय यांनी सांगितले. 

कंन्टेनमेंट झोनमधील आवक-जावक बंद 
शासनाच्या नव्या आदेशानुसार १२ कंन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. या भागातील आवक-जावक १५ दिवस पूर्णपणे बंद असेल. लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय गुरुवारी (ता. १४) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पांडेय यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT