crime  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : कर्जाचे हप्ते चुकविण्यासाठी दुचाकीवर बनावट क्रमांक टाकणारा अटकेत

दुपारी अडीचच्या सुमारास नारेगाव येथील दर्गा मस्जिद जवळ संशयास्पद दुचाकीस्वार दिसला.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दुचाकीसाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते चुकविण्यासाठी दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास नारेगाव येथे करण्यात आली. मुश्ताक शेख जाफर शेख (५१, रा. पुकराज नगर, न्यू भोकरदन, जि. जालना) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना दुपारी अडीचच्या सुमारास नारेगाव येथील दर्गा मस्जिद जवळ संशयास्पद दुचाकीस्वार दिसला. त्याला थांबवून दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या दुचाकीच्या क्रमांकाची (एमएच- २०-सीसी-२५१८) ऑनलाइन पडताळणी केली असता तो दुसऱ्याच दुचाकीचा क्रमांक निघाला. त्यामुळे आरोपीच्या ताब्यातील दुचाकीच्या चेसीस व इंजिन क्रमांकांची पाहणी केली असता मूळ क्रमांक (एमएच-२०-सीएल ८२२२) असा असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्याकडे दुचाकीबाबत कसून चौकशी केली तेव्हा त्याने ही दुचाकी अबरार सरदार खान (रा. रोशनगेट) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. या दुचाकीवर एचडीएफसी बँकेचे कर्ज असल्यामुळे त्याचे हप्ते चुकविण्यासाठी व बँकेने दुचाकी घेऊन जाऊ नये म्हणून बनावट क्रमांक टाकल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी दुचाकीसह त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्ता शेळके, किरण गावंडे, विठ्ठल सुरे, ओमप्रकाश बनकर, नवनाथ खांडेकर, संजय राजपूत, जितेंद्र ठाकूर, रमेश गायकवाड यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT