sambhaji nagar  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : आशा स्वयंसेविका करणार आणखी तीव्र आंदोलन ; सरकारविरोधात नाराजी; कामकाजावर बहिष्कार कायम

आशा स्वयंसेविका, गटप्रर्वतक यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय झालेला असताना अद्याप त्याची अमलबाजवणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ऑनलाइन कामावर बहिष्कार राहील, आणखी तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी युनियन संघटनेने मंगळवारी (ता. २३) द्वारसभेत दिला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आशा स्वयंसेविका, गटप्रर्वतक यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय झालेला असताना अद्याप त्याची अमलबाजवणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ऑनलाइन कामावर बहिष्कार राहील, आणखी तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी युनियन संघटनेने मंगळवारी (ता. २३) द्वारसभेत दिला.

मंगळवारी पुन्हा एकदा आशा स्वयंसेविका महापालिकेत जमा झाल्या. आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी युनियनतर्फे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेच्या यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी हा विषय शासनस्तरावरचा असून, तुमच्या भावना शासनाला कळविल्या जातील, असे आश्‍वासन दिले.

त्यानंतर महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात द्वारसभा घेण्यात आली. या द्वारसभेत पदाधिकाऱ्यांनी शासनावर टीका केली. शासन महिलांचे प्रश्न सोडविण्याचे केवळ नाटक करत आहे. त्यामुळे सरकारवर आता विश्वास ठेवायचा नाही. मोबदला वाढीच्या निर्णयाची घोषणा दोन महिन्यांपूर्वी झाली आहे. पण, अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. हे सरकार केवळ घोषणाबाजी करण्यातच माहीर आहे.

२९ जानेवारीपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी मंगल ठोंबरे यांनी यांनी केले. सुनीता जैस्वाल, अनिता दाभाडे, मंगल मोरे, मनोरमा रमंडवाल, हर्षा पवार, मीरा जाटवे, सुजाता धनेधर, ज्योती अवसरमल, जयश्री जाधव, सुनीता काळे, नीता बोटके, लंका अवसरमल, अनिता ताठे, गंगोत्री सोनवणे, जयश्री चोरमारे, सुनीता बत्तिसे, कल्पना पवार, अश्विनी उबाळे, ज्योती सागरे, दीक्षा आढाव, मनीषा जोगदंडे, पल्लवी कुटे, रंजना तुरनकमाने, सुनीता कामजळगे, माधवी पवार, अनुपमा जाधव, नीलिमा जगताप, सुनीता म्हस्के, माधुरी मुनवर, मनीषा साळवे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : भाषेची सक्ती केल्यास आम्ही शक्ती दाखवू - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT