MSRTC ST bus service to pandharpur sakal
छत्रपती संभाजीनगर

Ashadhi Wari 2023 : विठुरायाच्या दर्शनासाठी विशेष बससेवा

पैठण : आगार व्यवस्थापनाकडून २३ एसटी भाविकांसाठी धावणार

राजेश नागरे

पैठण : पैठण शहर व तालुक्यातील आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या लक्षणीय आहे. ही संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या निर्देशानुसार पैठण आगार व्यवस्थापनाने आषाढी पंढरपूर यात्रा २०२३ अंतर्गत एकूण २३ विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. या बसगाड्यांतून ७५ वर्षे वयापेक्षा अधिक नागरिक मोफत प्रवास करू शकणार आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांसह महिला निम्म्या तिकिटाने प्रवास करता येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येत्या येत्या २९ जूनला आषाढी एकादशी आहे. या उत्सवासाठी पैठण तालुक्यातील हजारो भक्तांनी पंढरीच्या वारीची तयारी केली असून, त्यांना यात्रा विशेष गाड्यांचा आधार असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीत सरसकट ५० टक्के सवलतीची घोषणा राज्य शासनाने केली होती. त्याची अंमलबजावणी सुरु असून, पंढरपूर यात्रेतही महिलांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहेत. तसेच ७५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना आषाढी वारीतही एसटी महामंडळ मोफत प्रवास घडविणार आहे.

२३ जूनपासून एसटीच्या विशेष सेवा पंढरपूरच्या यात्रेसाठी २३ जून ते ३ जुलै या कालावधीत आषाढी पंढरपूर यात्रा विशेष योजनेंतर्गत अतिरिक्त बसगाड्या आगारातून सोडल्या जाणार आहेत. यात्रेचा मुख्य दिवस २९ जून असल्याने भक्तांना त्यापूर्वीच तेथे पोहोचता येणार आहे.

आषाढी वारीसाठी भाविकांची गर्दी वाढणार असल्याचे एसटी महामंडळाने ग्राह्य धरले आहे. महिला सन्मान योजना आणि ज्येष्ठ सन्मान योजना असल्यामुळे प्रतिसाद वाढणार आहे.

प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता आगारातून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पंढरपूर यात्रेसाठी पैठण आगारातून एकूण २३ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या यात्रेतही ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत, तर ६५ वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि महिला भक्तांना ५० टक्के सवलत असणार आहे. — गजानन मडके, आगारप्रमुख, पैठण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT