Astik Kumar Pandey 
छत्रपती संभाजीनगर

स्मार्ट सिटीत तृतीयपंथीयांना मिळणार नोकरी, आस्तिककुमार पांडेय यांचा महत्त्वाचा निर्णय

माधव इतबारे

औरंगाबाद : तृतीयपंथीयांची समाजाकडून नेहमीच अवहेलना केली जाते. मात्र त्‍यांना समाज प्रवाहात आणण्यासाठी स्मार्ट सिटीतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमात कंत्राटी पद्धतीने नोकरीवर सामावून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. शहर बससेवा, स्मार्ट सिटीच्या कार्यालयात पहिल्या टप्प्यात या नियुक्त्या दिल्या जातील, असे श्री. पांडेय यांनी नमूद केले.


तृतीयपंथीयांची समाजाकडून होणारी अवहेलना थांबविण्यासाठी शासन, सेवाभावी, सामाजिक संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरण केले जात आहे. त्यांचा छळ थांबविण्यासाठी कायदे देखील करण्यात आले आहेत. काही तृतीयपंथीयांनी विपरीत परिस्थितीवर मात करून समाजात मानाचे स्थान मिळविले आहे. अनेकांनी राजकारणासह इतर कामांत ठसा उमटवला आहे. बोटावर मोजण्याएवढी उदाहरणे सोडली तर इतरांची मात्र अवहेलनाच सुरू आहे.

औरंगाबाद शहरात तृतीयपंथीयांची संख्या पाचशेपेक्षा अधिक असून, यातील अनेक जण सुशिक्षित असूनही रस्त्यावर फिरून पैसे मागून उपजीविका भागवितात. त्यांच्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यासंदर्भात श्री. पांडेय यांनी सांगितले की, तृतीयपंथीय हा घटक नेहमीच उपेक्षित राहिला आहे. समाजात त्यांना मानाचे स्थान मिळत नाही.

त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मानाचे स्थान देण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत काही तृतीयपंथीयांना कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचा संकल्प केला आहे. लवकरच त्याला मूर्त स्वरूप मिळेल. स्मार्ट सिटी अभियानातर्फे स्मार्ट बससेवा चालविली जाते. याठिकाणी बसची माहिती देण्यासाठी उद्घोषक किंवा इतर कामे त्यांना दिली जातील.

दोन महिन्यांत होणार प्रक्रिया पूर्ण
तृतीयपंथीयांना नोकरीत सामावून घेण्यासंदर्भातील प्रक्रिया आगामी दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी रीतसर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम् यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rice Price Hike: भातावरही महागाईची धार! तांदळाच्या भावात ११ टक्क्यांची वाढ; काय आहेत नवे दर?

Phaltan News : फलटणच्या सिद्धाली शहा ‘इंटरनॅशनल बुक’मध्ये; पालिकेत २१ व्या वर्षी नगरसेविका म्हणून निवड; प्रमाणपत्र देऊन गौरव

Satara Traffic Issue : वाहनांच्या गर्दीत साताऱ्याचा कोंडतोय श्‍वास; रस्ते तेवढेच, कोंडी वाढतीच, शहर बससेवाच ठरणार उतारा

Guinea Landfill Collapse : मुसळधार पावसाचा कहर! कचऱ्याचा डोंगर कोसळला; ३० जणांचा मृत्यू, अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली

Akola Ganeshotsav Special Trains: अकोल्यातून कोकण गाठणे सोपे;गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या; नागपूर-मडगाव गाड्यांना थांबा

SCROLL FOR NEXT