arrest Osamanabad News
arrest Osamanabad News  
छत्रपती संभाजीनगर

ह्रदयद्रावक! झाडांवर चालवितात तशी त्याच्यावर चालविली कुऱ्हाड, वाचा पुढे काय झालं

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : उधारीचे पैसे मागण्यास गेलेल्या दुकानदारावर कुऱ्हाडीने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली. विशाल मोरे असे त्या आरोपीचे नाव आहे. 

प्रकरणी X राहिल्याने फिर्यादी हिवाळेने सागरला वारंवार फोन केले. मात्र त्याने फोन उचलला नाही. दरम्यान, फिर्यादी व अमित सुरडकर यांनी सागरला 16 जानेवारी रोजी फोन केला असता, त्याने पैसे घेण्यासाठी पैठण गेटवर बोलावले. फिर्यादी व अमित हे पैठणगेटवर पोहोचले असता तिथे त्यांना सागर भेटला. त्यानंतर फिर्यादीने पैसे मागितले असता, सागर याने शिविगाळ करीत फिर्यादीच्या डोक्‍यात कुऱ्हाडीने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तर आरोपी विशाल मोरे (26, रा. सब्जीमंडी) याने फिर्यादीचे हात पकडून ठेवले. त्याचवेळी फिर्यादीच्या दोन परिचितांनी फिर्यादीची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी विशाल मोरेला अटक करण्यात आली. 

सोमवारपर्यंत पोलिस कोठडी 

आरोपी मोरेला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, त्याला सोमवारपर्यंत (ता.20) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी दिले. सुनावणीदरम्यान मुख्य आरोपी सागर रत्नपारखे याला अटक करणे बाकी असून, जीवघेणा हल्ला करण्यामागे आरोपींचा नेमका कोणता उद्देश होता, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का आदी बाबींचा तपास करावयाचा आहे आणि आरोपींकडून कुऱ्हाड जप्त करावयाची आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT