Aurangabad 6 thousand 800 crore DPR Walaj Shendra Metro Rail 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : मेट्रोसाठी ६ हजार ८०० कोटींचा डीपीआर!

वाळूज ते शेंद्रा मेट्रो रेल्वे व अखंड उड्डाणपुलासाठी पालिका प्रशासकांसमोर सोमवारी सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीदरम्यान मेट्रो रेल्वे व अखंड उड्डाणपुलासाठी सहा हजार ८०० कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. महामेट्रोतर्फे सोमवारी (ता. ३१) या डीपीआरचे महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर सादरीकरण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, भविष्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीदरम्यान २५ किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल व मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी डीपीआर तयार करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आदेश दिले होते.

त्यानुसार स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सविस्तर प्रकल्प आराखडा व शहराचा एकत्रित गतिशीलता आराखडा तयार करण्यासाठी महामेट्रोला कार्यारंभ आदेश दिले. त्यानुसार महामेट्रोने डीपीआर तयार केला आहे.

त्यात वाळूज ते शेंद्रा एमआयडीसीदरम्यान अखंड उड्डाणपुलासाठी तीन हजार ६०० कोटी तर मेट्रो रेल्वेसाठी ३ हजार २०० कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. दोन्ही कामांचा सहा हजार ८०० कोटी रुपयांचा डीपीआर तयार झाला आहे.

गतिशीलता आराखड्याचे होणार सादरीकरण

महामेट्रोने एकच उड्डाणपूल, मेट्रो रेल्वेसेवा व शहराचा गतिशीलता आराखडा तयार केला आहे. या डीपीआरचे सादरीकरण करण्यासाठी कंपनीतर्फे प्रशासकाकडे वेळ मागण्यात आली होती. त्यानुसार आता सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले जाणार आहे. यावेळी डीपीआरबद्दलही चर्चाही होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बदल होण्याची शक्यता !

मेट्रोसाठी डीपीआर तयार करण्यात आला असला तरी या प्रकल्पासाठी अनेक अडचणी राहणार आहेत. सर्वात मोठा प्रश्‍न हा एवढा निधी कुठून उभा राहणार? त्यासोबतच सध्या सुरू असलेल्या शहर विकास आराखड्यात मेट्रोसाठी लागणारी जमीन संपादित करावी लागेल.

तसेच छावणी भागातून मेट्रोचा पूल उभारण्याकरिता संरक्षण मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल. या अडचणी लक्षात घेता, ज्या रस्त्यावर भूसंपादनाचा जास्त त्रास होणार नाही, याचा विचार करून डीपीआरमध्ये बदल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

''शबरीमलातील चोरीची सीबीआय चौकशी करा'' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची मागणी

Velhe News : लागोपाठ तीन दिवस राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दहा ते पंधरा पर्यटक किरकोळ जखमी

Bhoom News : दबंग खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध भूमचे पोलीस निरीक्षक वाद पेटणार

Beed: धर्मांतरासाठी कैद्यांवर दबाव, कारागृह अधीक्षकांविरोधात तक्रार; बीडमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT