00accident_86_29.jpg
00accident_86_29.jpg 
छत्रपती संभाजीनगर

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाळूजमध्ये वाहतूक कोंडी

रामराव भराड

हा अपघात होताच मोठी गर्दी जमा झाली. वाळूज महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वाळूज (जि.औरंगाबाद) : भरधाव जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा चिरडून जागीच मृत्यू, तर एक जण जखमी झाला. हा अपघात वाळूज Waluj येथील कामगार चौकात सोमवारी (ता.१४) दुपारी झाला. अपघातातील शेख फिरोज हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकाकडून वाळूजकडे वळण घेत होता. तर ट्रक (एम एच १२, एफ झेड -७७६३) हा पंढरपूरकडून वाळूजकडे Aurangabad भरधाव जात होता. शेख फिरोजने वाळूजकडे वळण घेताच त्याच्या दुचाकीला (एमएच ४१ ए एच- ८७४२) भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात त्याच्या पाठीमागील दुचाकीस्वार ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाला. दुचाकीचालक दूर फेकला गेल्याने तो जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी Waluj MIDC Police घटनास्थळी धाव घेत चिरडून ठार झालेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह घाटीत दाखल केला. त्याची अद्याप ओळख पटली नाही. तर दुचाकी चालक शेख फिरोज हा अपघात पाहून खूप घाबरला होता. मोठी गर्दी जमली होती. या गर्दीत शेख फिरोज हा निघून गेला. त्यामुळे या अपघाताबाबत पोलिसांनाही थांगपत्ता लागेना. Aurangabad Accident News One Person Died In Waluj

वाहतूक ठप्प

हा अपघात होताच मोठी गर्दी जमा झाली. वाळूज महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान वाळुज एमआयडीसी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी धाव घेत ही वाहतूक सुरळीत केली.

मृताची ओळख पटेना

या अपघातात चिरडून ठार झालेल्या दुचाकीस्वाराची अद्यापही ओळख पटली नाही. विशेष म्हणजे दुचाकीची ऑनलाईन माहिती काढली असता ती सुद्धा रेकॉर्डवर दिसून येत नसल्याचे पोलिस उपनिरीक्षक राहुल निरवळ यांनी सांगितले.

पाच तासांनंतर सापडला जखमी

या अपघातात जखमी झालेला शेख फिरोज हा पोलिसांना काही न सांगता गर्दीतून निघून गेला होता. तो जखमी असल्याने त्याचा वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दवाखान्यात शोध घेतला. मात्र, त्याचा थांगपत्ता लागेना. शेवटी अनेक दवाखाने शोधत पोलीस घाटीत पोचल्यानंतर पाच तासाने तो सापडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT